सोलापूर : एक आयशर टेम्पों, स्वीप्ट कारसह १९० बॉक्स गोवा बनावटीचा अवैध मद्यसाठा असा एकून २६ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने ही कारवाई केली
सोलापूरचे अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क ब विभागचे प्र. निरीक्षक अंकुश आवताडे, व निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सोलापूर चे प्र.निरीक्षक सुदर्शन संकपाळ, दुय्यम निरीक्षक सुनिल पाटील, झगडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर व जवान आण्णा कर्चे, प्रकाश सावंत, चेतन व्हनगुंटी, नंदकुमार वेळापुरे, किशोर लुंगसे, विकास वडमिले व विजय शेळके यांच्या पथकाने दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री ७ ते ९:३० चे सुमारास शेटफळ ते कुर्डवाडी रस्त्यावर, शेटफळ चौकालगत हॉटेल शिवप्रसाद धाब्यासमोर कारवाई केली .त्याठिकाणी १ विलास मोराळे, २. कृष्णा मुजमुले, ३. गणेश जाधव आणि ४. मिलिंद मगरे या चौघांना अटक करून त्यांचे ताब्यातील एक स्वीप्ट कार, आयशर टेम्पों असे दोन वाहने व गोवा बनावटीचे विविध ब्रँडचे एकुण १९० बॉक्स जप्त करून आरोपी विरूद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली. पुढील तपास प्र.निरीक्षक भरारी पथक सोलापूर सुदर्शन संकपाळ हे करीत आहेत.

















