मुंबईतील एक दिव्यांग मॉडेल रजिस्ट्रार ऑफिसमध्ये तिच्या स्वताच्याच विवाह नोंदणीसाठी आली होती.परंतु संबंधित रजिस्ट्रार कार्यालय हे दुसऱ्या मजल्यावर असल्या कारणाने त्या मॉडेल विराली मोदी यांना दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी अडचण निर्माण झाली होती.
विरालीनं थेट देवेंद्र फडणवीसांना ट्विट करत आपली अडचण मांडली. या तक्रारीची तात्काळ दखल देत संबंधित रजिस्टार अधिकार्याला दखल घेण्याचे आदेश फडणवीसांनी दिले. फडणवीसांच्या एका फोननंतर सुत्र हलली आणि तरूणीच्या लग्नासाठी संपुर्ण यंत्रणा कामाला लागली. यानंतर लग्नाचे फोटो ट्विट करत संबंधित तरूणीनं फडणवीसांचे आभार मानले.
मात्र झाल्या प्रकाराबद्दल नम्रपुर्वक माफी मागत यापुढे याबाबत काळजी घेऊ असही फडणवीसांनी आश्वासन दिले. यावरून गृहमंत्री फडणवीस यांची सोशल मीडियावर असलेली करडी नजर याचा प्रत्यय आला.