सोलापूर, दि.8(जिमाका): जागतिक महिला दिनानिमित्त कोविड काळात साथरोग नियंत्रणासाठी आणि कोविड लसीकरणासाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या जिल्ह्यातील महिलांचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात आला.
शिवछत्रपती रंगभवन येथे झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी चारूशिला देशमुख, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. माधुरी दबडे यांची उपस्थिती होती. डॉ. दबडे यांनी स्त्रियांचे आरोग्य यावर मार्गदर्शन केले. श्रीमती सातपुते यांनीही महिलांना स्वरक्षण आणि स्वावलंबन याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात लसीकरणासाठी उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यिका, समुदाय आरोग्य अधिकारी, गावकामगार तलाठी, कोतवाल व पोलीस पाटील महिलांचा गौरव करण्यात आला. त्यांना जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांच्या हस्ते संसारोपयोगी वस्तू, साडी व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
श्रीमती पवार यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती देशमुख यांनी कार्यक्रमाचा समारोप केला. कोविड काळात आणि लसीकरण मोहिमेत उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या महिला
श्रीमती एस आय शेख (तलाठी सांगवी बु),श्रीमती एम एच भगत (तलाठी भोसगे),श्रीमती आर एस कुंभार (कोतवाल हंजगी),श्रीमती एम ए निमगिरे (तलाठी कव्हे),श्रीमती एस बी डोळे (पोलीस पाटील वाघाचीवाडी), श्रीमती राजकुवर सोनवणे (कोतवाल मळेगाव),श्रीमती जयश्री कल्लोळे (तलाठी भोसे),सरोजनी कोळी (कोतवाल डोणज), श्रीमती ज्योती पाटील (पोलीस पाटील सिध्दनकेरी), श्रीमती जयश्री हुच्चे (तलाठी सिंदखेड), श्रीमती रेणुका कोळी (कोतवाल कुसूर),श्रीमती वर्षाराणी बगले (पोलीस पाटील माळकवठे),सौ प्रिया खंदारे (तलाठी कवठे),सौ योगिता पवार (पोलीस पाटील वांगी),श्रीमती माधुरी घाडगे (तलाठी यलमार मंगेवाडी), श्रीमती लक्ष्मी नरळे (कोतवाल डिकसळ),श्रीमती सुरेखा खांडेकर (पोलीस पाटील सेामेवाडी),श्रीमती प्रिती काळे (तलाठी वेणेगाव),श्रीमती अनिता गाडे (कोतवाल उंदरगाव),श्रीमती सुहासिनी अवघडे (पोलीस पाटील भोसरे),श्रीमती शितल सुर्यवंशी (तलाठी देवळाली),श्रीमती अश्र्विनी शेंबडे (कोतवाल शेलगाव क.),श्रीमती सारिका ठोसर (पोलीस पाटील कंरजे),श्रीमती पल्लवी डांगे (तलाठी पानीव),श्रीमती वृषाली सरवळे (कोतवाल तांबवे), श्रीमती अपर्णा लोंढे (पोलीस पाटील सदाशिवनगर), श्रीमती गीतांजली जाधव (तलाठी वाघाली), श्रीमती अर्चना कादे (पोलीस पाटील वाळूज),श्रीमती दिपाली वाघमारे (कोतवाल बोपले), श्रीमती प्रतिभा घुगे (तलाठी दिंडुर),श्रीमती गुरूदेवी,चौधरी (कोतवाल कुंभारी),श्रीमती शशिकला पाटील (पोलीस पाटील दर्गनहळळी),श्रीमती आर कचरे (तलाठी शेटफळ),श्रीमती व्ही बी कुंभार (कोतवाल ओझेवाडी), श्रीमती साधना देठे (पोलीस पाटील तुंगत).
◆आरोग्यसेविका पुढीलप्रमाणे :-
श्रीमती मुक्ताबाई मनोहर रेड्डी (प्रा.आ.केंद्र मोहोळ), श्रीमती सुलताना शेख, (प्रा.आ.केंद्र घेरडी सांगोला), श्रीमती विष्णु व्ही.व्ही (प्रा.आ.केंद्र पानगाव बार्शी ), श्रीमती मंजुषा टेकाडे (प्रा.आ.केंद्र कोर्टी करमाळा ), श्रीमती वैरागी एम आर (प्रा.आ.केंद्र माळीनगर माळाशिरस), श्रीमती संगीत बिराजदार (प्रा.आ.केंद्र सलगर (बु) मंगळवेढा), श्रीमती वनिता पारिसे (प्रा.आ.केंद्र पुळूज पंढरपूर ), श्रीमती मोनिका जाधव (प्रा.आ.केंद्र कोंडी उ.सोलापूर ), श्रीमती उपाध्ये पी.के. (प्रा.आ.केंद्र वळसंग द.सोलापूर) .
◆आरोग्य सहाय्यिका पुढीलप्रमाणे:-
विद्या सुभाष थिटे (प्रा.आ.केंद्र, कामती), जयश्री जाधव (प्रा.आ.केंद्र नाझरे), श्रीमती सोमवंशी एस एस (प्रा.आ.केंद्र, मैंदर्गी), मनियार शिरीन (प्रा.आ.केंद्र आगळगाव), हसीना मनेरी (प्रा.आ.केंद्र साडे), श्रीम. गायकवाड एमव्ही (प्रा.आ.केंद्र टेंभूर्णी), निर्मला राजेंद्र मोरे (प्रा.आ.केंद्र वेळापुर), श्रीम. सखुबाई घाडगे (प्रा.आ.केंद्र भोसे), सुवर्णा खरात (प्रा.आ.केंद्र उंबरे पागे), रश्मी सावरे ( प्रा.आ.केंद्र मार्डी), श्रीम. शिंदे जे. एस. (प्रा.आ.केंद्र होटगी).
◆समुदाय आरोग्य अधिकारी पुढीलप्रमाणे*-
नौशाद शेख (प्रा.आ.केंद्र अनगर), अनिता मोटे (प्रा.आ.केंद्र महूद), सुरेखा बिराजदार (संगोळगी), माधुरी काळे (प्रा.आ.केंद्र उपळे दु), साके वृषाली (विहाल), श्रीमती बाभुळकर पी.डी. (प्रा.आ.केंद्र रोपळे क), माने अर्चना (प्रा.आ.केंद्र माळीनगर), स्वाती बडिगेर (प्रा.आ.केंद्र सलगर (बु.), रुपाली सुरवसे (प्रा.आ.केंद्र कासेगाव), अंजली पारशेट्टी (प्रा.आ.केंद्र मार्डी) आणि आत्मज्योती घोरुडे (प्रा.आ.केंद्र औराद).
◆आशा स्वयंसेविका पुढीलप्रमाणे
– चंदना जगताप, अनगर, शितल पांढरे (महूद), अनिता गायकवाड (मैंदर्गी), लक्ष्मी पवार (चिखर्डे), शीला दुर्गुळे (रोशेवाडी) पवार आर. एच. (परिते), विद्या गायकवाड (माळीनगर), विमल पाटील (सलगर (बु), शमा पठाण (खर्डी), अर्चना कांबळे (कळमण) आणि जयश्री दोडमनी (औराद)

















