सोलापूर – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या शिफ़ारसीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या आदेशान्वये सोलापुर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापुर शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील नागनाथ रसाळे यांची सोलापुर शहर काँग्रेसच्या वरीष्ठ उपाध्यक्ष पदी निवड केली.
सुनील रसाळे यांच्या निवडीचे पत्र जनवास्तल्य निवास सात रस्ता येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते देऊन त्यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दास शेळके, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, नगरसेवक विनोद भोसले, सेवादलाचे प्रदेश सरचिटणीस अशोक कलशेट्टी, माजी नगरसेवक N. K. क्षीरसागर, शहर कांग्रेसचे सचिव राजन कामत, शहर कांग्रेसचे उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम, शहर कांग्रेस चे सचिव पुरुषोत्तम श्रीगादी, शहर कांग्रेसचे उपाध्यक्ष अनिल मस्के, शहर कांग्रेसचे सचिव विनोद क्षीरसागर, सुशील बंदपट्टे, विवेक कन्ना, राजेंद्र शिरकुल, यशवंत रसाळे, सौरभ साळुंखे, सोमा कालेकर, शंतनू सरकार, बाबा शेख, आदि बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


















