देशातील मराठी समूहाच्या संघटनेच्या वतीने 20 एप्रिल रोजी मराठी भाषिक तरुणांची संयुक्त बैठक झाली. मराठी माणसाला तातडीने मदतीची गरज तसेच सर्व महाराष्ट्रातील सर्व जाती धर्माला एकत्र आणण्याच्या मोहिमेवर बैठकीत चर्चा करण्यात आली, त्याद्वारे प्रदेशातील व देशातील प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात मराठी समूह एकत्र केला जाईल.
मराठी समुहाने सर्वांच्या प्रगती साठी एकत्र यावे, अशी यावेळी बापू पाटील यांच्याकडून विनंती करण्यात आली. क्षत्रिय मराठी संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गौरव पवार, महाराष्ट्र अध्यक्ष गणेश महाराज शिंदे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या सभेत सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
यापूर्वी महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, अमरावती, नागपूर, अहमदनगर, सांगली, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, नांदेड, अकोला, वाशीम, चंद्रपूर, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक, यवतमाळ, वर्धा, जळगाव, धुळे, पालघर, ठाणे, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, हैद्राबाद, बेंगळूर, या जिल्ह्यांतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी पाच सदस्यीय राष्ट्रीय समिती स्थापन करण्यात आली असून, हि समिती पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करणार आहे.
1) देशातील मराठी माणसाच्या समस्या, रोजगार, शिक्षण आणि सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक शहरात “मराठी कम्युनिटी सपोर्ट सेल” सुरू करण्यात येणार आहे. “लोकशाहीचा सर्व समावेशक भारत देश” कोणत्याही जाती धर्माला तुच्छ न लेखात अंगात मराठी माणूस म्हणून समाज कार्य करणे व त्यासाठी मराठी माणसाला सक्षम करणे अन्याय पासून बचाव करणे हे उद्दिष्ठे ठेऊन मराठी एकता संघटना देश भर कार्य करेल. जमा होणाऱ्या निधीतून खर्च करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
2) देशातील सर्व मराठी संघटनांच्या सोबत त्यांच्या चळवळीचा सहभाग होऊन संघर्ष वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल.
3) विद्यर्थ्यांचें प्रश्न व फी माफीत मराठी विद्यार्थ्यांची अडवणूक होऊ नये म्हणून कॉलेजला इशारा पत्र देण्यात येईल. तसेच खाजगी शाळा अमराठी संस्थाचालकांकडून होत असलेला अन्याय याबाबत मराठी संघटना आवाज उठवेल.
4) क्षत्रिय मराठी संघटना ही देशभरातील सर्व जातींच्या समाजाचा एक भाग आहे.
5) देशातील मराठा, धनगर, ओबीसी सर्व आरक्षणासाठी देशभरातील मराठी बांधवांसोबत लढणार.
शिवकार्य, गडकोट किल्ले ऐतहासिक वास्तू यांचे रक्षण संवर्धन करणे हे काम राहील, खेळाडू, कलाकार, सर्व क्षेत्रातील समूहासोबत असेल या वेळी प्रदेश अध्यक्ष महिला विभाग चित्रा वाघमारे, शिवेंद्रराजे गायकवाड, जितेंद्र चव्हाण, राम खुर्दळ, गिरीश पाटील, हर्षल पवार, स्वप्नील खरात, विद्याधर उगले, नितेश राणे, वैभव देशमुख शरद पोपटराव पवार, शुभम पाटील, हार्दिक निगेल, मंगेश कुलकर्णी, बापू पवार, सचिन पवार, संकेत सोमवंशी, महेंद्र मगर, शुभम पवार, शुभम पवार आदी उपस्थित होते. शुभम कांबळे, चेतन आहेर, तसेच मुंबई पुणे शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.



















