काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि माजी परिवहन सभापती केशव इंगळे यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली, दोघे एकमेकांच्या अंगावर धावून गेले, हाणामारी झाली असती मात्र इतर पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वाद थांबला, परन्तु या भांडणाची क्लिप व्हायरल झाली आणि वाद चव्हाट्यावर आले. यानंतर काँग्रेस भवनात केशव इंगळे यांच्यावर कारवाई होणार अशी चर्चा ऐकण्यास मिळाली, वाले आपल्या पद्धतीने चांगले काम करत आहेत, केशव इंगळे यांचं बोलणं चुकीचं होत, ते कायम असेच बोलतात, वाद करतात, ही वेळ नव्हती, प्रकाश वाले यांच्यामुळे 14 चे 4 नगरसेवक होतील, मग इंगळे 14 चे 40 करणार होते का?अशी भाषा कार्यकर्ते करत आहेत,हा वाद थेट वरिष्ठांपर्यंत गेला, त्यामुळे केशव इंगळे यांच्यावर कारवाई निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान शनिवारी काँग्रेस भवनासमोर असलेल्या डिजिटल बॅनरवर काळी शाई फेकून अज्ञातांनी पळ काढला, केशव इंगळे यांच्यासोबत वाद झाल्यानंतर ही घटना घडली त्यामुळे या वादातून तर हे झाले नसेल ना असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र इंगळे 40 वर्ष निष्ठावंत आहेत ते असे करणे शक्य नाही, त्यांना बदनाम करण्यासाठी कुणी असे कारस्थान तर केले नसावे असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.
केशव इंगळे यांच्याशी याप्रकरणी चर्चा केली असता कारवाईला सामोरे जाईन पण हा मागासवर्गीयांच्या गळचेपीचा प्रकार झाला, मी आपली भूमिका कायम आक्रमक पणे मांडत असतो, 40 वर्ष झाले मी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, मी भाजप, शिवसेना, वंचित, एमआयएम अशा कुठल्या पक्षात जाऊन परत काँग्रेस मध्ये आलो नाही, जाणीवपूर्वक बैठकीला बोलावले जात नाही, कार्यक्रमाचे निमंत्रण मिळत नाही, हा अन्याय नाही का? पक्षाच्या बैठकीत आमचा रोष, भूमिका व्यक्त करायची नाही का ? कारवाई होऊ दे, मी नंतर माझी भूमिका मांडून कोण किती पाण्यात हे दाखवेन असे इंगळे म्हणाले.
कोण आहेत केशव इंगळे
शिक्षण : एम ए, एमएसडब्लू, एलएलबी
मागील 40 वर्षांपासून काँग्रेस पक्षात कार्यरत, NSUI जनरल सेक्रेटरी, युवक काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणी सदस्य, सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी आजतागायत पदावर आहेत.
2007-08 महापालिका परिवहन सभापती



















