सोलापूर : तांदुळवाडी – केगाव नवीन बाह्यवळण (रींगरुट) रस्ता भूसंपादन बाधित शेतकरी संघटना कासेगाव, दक्षिण सोलापूर” यांच्या शिष्टमंडळाने जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांची मुंबई येथे भेट घेतली.
सोलापूर मधील नियोजन भवन येथे झालेल्या भूसंपादन विषयी संयुक्त बैठकीमधील झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व स्थानिक आमदार यांच्या सोबत सोलापूर बाह्यवळण भूसंपादन मावेजा तसेच सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड एक्सप्रेस या वाढीव मोबदला विषयी मंगळवार २१ मार्च २०२३ रोजी मुंबई येथे संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली आहे असे शिष्टमंडळास सांगितले.
यावेळी समितीच्या वतीने परमेश्वर गाढवे, अमोल वेदपाठक, विक्रम गाढवे, महेश भोज व चंद्रकांत कुलकर्णी हे शेतकरी उपस्थित होते.


















