साेलापूर – ब्रह्मदीप सामाजिक संस्था आणि कुमठे शिक्षण संकुलाच्या वतीने रविवारी आयाेजित केलेल्या रक्तदान शिबिरात १६० जणांनी रक्तदान केले. माजी आमदार दिलीप माने, शिक्षण संकुलाचे विश्वस्त जयकुमार माने यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले.
माजी नगरसेवक बाळासाहेब माने, युवा नेते पृथ्वीराज माने, ब्रह्मदीप संस्थेचे संस्थापक अजित माने, चंद्रकांत लिंबिताेटे, गुरुसिध्दप्पा कस्तुरे, महादेव आवताडे, रसूल शेख, ईलाही शेख, निखील भाेसले, म.ज.माेरे, सिद्राम कटगेरी, ब्रह्मदीपचे अध्यक्ष समीर शेख यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
काेराेनाचा प्रादूर्भाव वाढताेय. काही रक्तपेढ्यांना रक्ताची गरज असल्याचे जाणवले. सामाजिक बांधीलकी म्हणून रक्तदान शिबिराचे आयाेजन केले. ब्रह्मदीप संस्थेने सध्या वृक्ष संवर्धनाची माेहिम हाती घेतली आहे. यापुढील काळातही सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविणार असल्याचे अजित माने म्हणाले.
या शिबिरात कुमठेसह हत्तूरे वस्ती, राेहिदास नगर, साखर कारखाना परिसर, साेरेगाव भागातील रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रमाेद कुसेकर, सचिव इसाक शेख, प्रमाेद व्हरडे, मल्लिकार्जुन म्हेत्रे, फारुक शेख, प्रवीण आवताडे, जटींगा नागणसुरे, अशाेक बिंदगे, हणमंत गुरव, नागेश व्हंड्राव यांनी परिश्रम घेतले.


















