सोलापूर : शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडताना भारतीय जनता पार्टीवर चांगलेच तोंडसुख घेतले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून ते आज पडेल उद्या पडेल म्हणत भारतीय जनता पार्टी खालच्या स्थराला जाऊन टीका करत आहे, हा महाराष्ट्र संस्काराचा आहे, संस्कृतीचा महाराष्ट्र आहे, परंपरेचा महाराष्ट्र आहे तुम्ही मला प्रश्न विचारता किरीट सोमय्या सारख्या एखाद्या फालतू कार्यकर्त्याने अशा प्रकारचे व्यक्तव्य करणे हे तुम्हाला तरी पटत का ? राजकारणात मीडियाने आशा गोष्टीला थारा दिला नाही पाहिजे असे मत शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले आहे.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुळे या राज्यात भारतीय जनता पार्टीला वाढ व सत्तेस पोषक वातावरण झालं. 25 वर्षे शिवसेनेचे त्यांना सहकार्य लाभले. आणि सत्ता मिळाली नाही याचे मोठं दुःख त्यांना आहे. त्यातून व्यक्तिगत आरोप करणे, व्यक्तिगत नालस्ती करणे, केंद्रीय यंत्रणेचा वापर करून त्रास देणं असे प्रयत्न सातत्याने केले जातात. तो एक सत्ता मिळवण्याचा भाग आहे. मागील 50-60 वर्षात हा मार्ग कुणी अवलंबला नाही देशाच्या राजकारणात हे चुकीचे होत आहे. परंतु महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असे ही खासदार बारणे यांनी सांगितलं.

















