सोलापूर : कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेतर्फे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती संघटनेच्या कार्यालयात उत्साहाने साजरी करणेत आली.
यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करणेत आले. कार्यकारी अभियंता कटकधोंड, कुलकर्णी उपस्थित महिलांपैकी प्रतिनिधी म्हणून आर आर कांगरे, संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, बी के चव्हाण, चंद्रकांत होळकर, राजगुरू, वैजिनाथ गायकवाड, किशोर कांबळे यांनी क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.



















