कासेगाव —-दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथील अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत येणगुरे वाडकर पुरस्कृत शिव शंकर शेतकरी विकास पॅनलने प्रतिस्पर्धी शंभू महादेव ग्राम विकास आघाडी पॅनल चा दारुण पराभव करत 13 जागा जिंकत आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यात अत्यंत चुरशीच्या समजल्या जाणाऱ्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. अनेक वर्षापासून लांबणीवर पडलेल्या सोसायटीच्या निवडणूका त्याचबरोबर करोना महामारी चे संकट टळल्यामुळे या सोसायटीच्या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन 686 मतदानापैकी 599 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला व या निवडणुकीत पॅनल टू पॅनल मतदान करून येणगुरे वाडकर पॅनल च्या हातात एकहाती सत्ता देऊन गड अबाधित राखण्यात यश मिळविले.
सोसायटी ही शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असते त्यातूनच शेतकऱ्यांना पतपुरवठा करून शेती विकासासाठी हातभार लावला जातो तो पतपुरवठा सुरळीत करण्यासाठी चांगल्या उमेदवारांची व चांगल्या नेतृत्वाची गरज असते म्हणून मतदाराने या निवडणुकीमध्ये येणगुरे व वाडकर पॅनेलला स्पष्ट बहुमत देऊन विश्वास संपादन केला आहे. या निवडणूकीत मतदारान बरोबरच गावकर्यांनी सहकार्य केल्यामुळे हा विजय निश्चित झाल्याचे यावेळी पॅनल प्रमुख शंकर वाडकर यांनी सांगितले.
निवडून आलेले उमेदवार सर्वसाधारण कर्ज गटातून शंकर वाडकर 347 गणेश वाडकर 330 हनुमंत जाधव 293 सुधाकर माळी 299 आप्पाराव पाटील 322 असलम तांबोळी 303 उद्धव विभुते 309 श्रीशैल भोज 289 महिला प्रतिनिधी मतदारसंघ द्रोपदी बरडे 325 सुरेखा मोरे 313 इतर मागास प्रवर्ग पांडुरंग हेडे 330 विविध जाती जमाती भटक्या विमुक्त म्हाळाप्पा गुड 317 अनुसूचित जाती जमाती सखाराम हब्बु 317 यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.

















