पंढरपूर : भाजप कडून सगळे मुद्दे सोडून फक्त हिंदू मुस्लिम, गरिबी एवढच बोलले जाते. यामुळे देशाबद्दल चिंता वाटते. हे ध्रुवीकरण देशाला परवडेल का? अशी शंका माजी केंद्रीय मंत्री शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी व्यक्त केली आहे. तसेच भाजपला धार्मिक ध्रुवीकरण करून देश अशांत करायचा असल्याचा आरोप त्यांनी केला.
उत्तरप्रदेश निवडणूक दरम्यान ओवेसी यांच्यावर झालेला गोळीबार झाला, त्या गोळ्या पायाखाली गेल्या. हे धार्मिक ध्रुवीकरण होते. तो भाजप चा प्रचारक आहे. उनाव, हाथरास, गंगे मधील प्रेते हे मुद्दे प्रचारत आले का ? मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्याच्या अंगावर गाडी घातली आला का हा मुद्दा ? फक्त हिंदू मुस्लिम हाच मुद्दा का? गरीबी वरच फोकस केला जातोय. देश होरपळतोय बेरोजगर , महागाई ,महिला अत्याचार हे मुद्दे नाहीत का. हे पाहिल्यानंतर देशाबद्दल चिंता वाटते.
महाराष्ट्र सगळा तमाशा पाहतोय, दोन माजी मुख्यमंत्री भ्रष्टाचाराचे आरोप वरून पायउतार झाले पण सध्या जो तमाशा सुरू आहे असे कधी झाले नाही.काश्मीर फाईल्स वरून सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. जखमांच्या खपल्या काढून रक्त वाहायला लावू नका. काश्मिरी पंडित साठी फक्त बाळासाहेब ठाकरे उभे राहिले. त्यांना राज्यात शिक्षणात आरक्षण दिले. असा प्रश्न विचारला. तुम्ही सात वर्ष केंद्रात सत्तेत आहात तुम्हाला राग आहे चीड आहे तर त्यांचे पुनर्वसन करा.
सिनेमा पाहा आणि पेटून उठा म्हणजे काय आहे. इतिहास चिवडायचा झाला तर औरंगजेब पासून फाईल तयार करावी लागेल. आम्ही शिवसेनेची फाईल तयार करतो. 1992 ला तुम्ही कुठे होतात ये पण कळून जाईल. एवढ्या वर्षात भाजपने काश्मिरी पंडित साठी काय केले. व्हिपी सिंग यांचे सरकार असताना काश्मिरी पंडितांना घालवल आहे. तेव्हा भाजप त्यात सरकार मध्ये होता. त्यावेळी भाजपच्या कोणत्या नेत्याने व्हीपी सिंग सरकार चा निषेध केला. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुका ठेवून आग लावू नका असा इशारा सावंत यांनी दिला.


















