सोलापूर : भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य अवाक झाला. दरम्यान यावर एबीपी माझा या वृत्तवाहिनीने सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी,
पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की, आम्हाला शिवसेना संपवायची नाही, हिंदुत्व टिकवायचं आहे. आमची या सरकारमध्ये घुसमट होत होती मात्र या दोन पक्षामुळे आम्ही बदनामीच्या खाली गेलो त्यात संजय राऊतने भर घातली असे सांगत सर्व आमदार खुश आहेत, आमचं नेतृत्व आता राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत.
दरम्यान त्यांनी पुन्हा आपल्या स्टाईलने काय तो समुद्र, काय तो वर्षा बंगला, काय तो देवासारखा देवेंद्र आणि काय तो आमचा कणखर नेता एकनाथ शिंदे…. असे म्हणून काय तो डोंगार, काय तो हाटेल, काय ती झाडी सर्वच ओके या वाक्याची आठवण करून दिली…

















