Thursday, March 5, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

कामगार नेते नरसय्या आडम मास्तरांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय घडामोडींचा होणार उलगडा ; सोलापुरात या दिवशी होणार आत्मचरित्राचे प्रकाशन

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
21 May 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





भारताचा कम्युनिस्ट पक्ष  (मार्क्सवादी),सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने ज्येष्ठनेते तथा माजी आमदार कॉ.नरसय्या नारायणराव आडम यांच्या 79 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 जून 2023 रोजी सांयकाळी 5 वाजता सोलापूर महानगरपालिका समोरील नॉर्थकोट हायस्कूल मैदान येथे आत्मचरित्र प्रकाशन सोहळा  माकपचे जिल्हा सचिव अँड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे.या  सोहळ्यास माकपचे महासचिव माजी खासदार कॉ.सीताराम येचुरी, माकपचे पॉलिटब्युरो सदस्य डॉ.अशोक ढवळे, माकपचे राज्य सचिव डॉ.उदय नारकर आदीं उपस्थितीत राहणार आहेत. 


किमान 50  हजार जनसमुदायांच्या साक्षीने हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती अँड.एम.एच.शेख यांनी दिली. याची जय्यत तयारी ही सुरू आहे असे ही सांगण्यात आले.  



या पत्रकार परिषदेस मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव मंडळ सदस्य कॉ.रंगप्पा मरेड्डी, प्रा.अब्राहम कुमार, कुरमय्या म्हेत्रे, सुनंदा बल्ला, व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, नसीमा शेख, शेवंता देशमुख,म.हनिफ सातखेड, अँड.अनिल वासम आदी उपस्थित होते.


माकपचे महासचिव कॉ.मा.खासदार सीताराम येचुरी यांनी मनोगत व शुभेच्छा संदेश दिले असून माकपचे पॉलीट ब्युरो सदस्य कॉ.डॉ.अशोक ढवळे यांनी प्रस्तावना दिली आहे.


या पुस्तक निर्मितीसाठी सोलापुरातील अनुभवी पत्रकार  दत्ता थोरे,  संतोष पवार यांनी आत्मचरित्र लेखनासाठी शब्दांकनाचे परिश्रम घेतले. बाळकृष्ण दोड्डी यांनी समन्वय साधले. सदर पुस्तक पुण्यातील युनिक फिचर्स च्या समकालीन प्रकाशनच्या वतीने  करण्यात येणार असून महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार  व सिद्धहस्त लेखक  गौरी कानेटकर यांनी संहिता संपादन तर सुहास कुलकर्णी यांनी पुस्तकाचे संपादन केले तसेच आनंद आवधानी यांनी मुद्रण समन्वय साधले आहे.  


 

भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चे केंद्रीय समिती सदस्य तसेच  महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव राहिलेले कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी सोलापूर जिल्ह्यात पक्ष उभारणीसाठी दिलेले योगदान बहुमोल आहे. जनवादी आणि वर्गीय लढ्याची धार वाढवण्यासाठी अविरतपणे संघर्षाच्या मैदानात उतरून जनतेला न्याय मिळवून देताना त्याग आणि निस्पृह वृत्तीतून पक्षाचा जनाधार वाढवण्यात यशस्वी झाले. 




पहिल्यांदा  आडम मास्तर हे 1968 साली महापालिकेच्या निवडणूकीत काँगेसचे तत्कालीन दिग्गज नेते माधवराव कोंतम यांच्या विरोधात म्हणजे प्रस्थापितां विरुद्ध कामगारांचा प्रतिनिधी अशी झुंज दिली .यात निसटता पराभव होता मात्र त्यामुळे त्यांच्या राजकीय जीवनाला कलाटणी  मिळाली. 


यानंतर येईल त्या परिस्थितीत,  येईल त्या प्रश्नांना घेऊन रस्त्यावरचा संघर्ष सुरू झाला. पोलिसांची दमनशाही लाठ्या काठ्या,तुरुंग, भूमिगत, प्राणघातक हल्ले,खोटी गुन्हे, यंत्रणेचा दबाव हा वाढतच राहिला पण कधीच माघार घेतली नाही.ही लालबावट्याची पोलादी शिस्त कधीच भंग होऊ दिली नाही. एकंदर सरासरी आयुष्यात 2 वर्षे तुरुंगवास,दोनशेहून अधिक खटले,तीन वेळा मिसा कायद्यान्वये  अटक, महाराष्ट्रातील सोलापूर, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, येरवडा, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, मुबंई असे निम्याहून अधिक तुरुंग पाहिले. आजही पोलिसांचे खोटी गुन्हे, खोटी खटले चालूच आहेत. रस्त्यावरच्या लढाई सोबत न्यायालयीन लढाई सुद्धा अविरतपणे सुरू आहे. 


कामगार चळवळ आणि न्याय हक्काच्या लढ्यावर विश्वास ठेवून आमजनता आणि कामगारांनी मला तीन वेळा नगरसेवक व तीन वेळा आमदार म्हणून मला त्यांचे सभागृहात व विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्या प्रत्येक संधीला मी परिपूर्ण न्याय देण्याचे कर्तव्य बजावले आहे. कष्टकरी-कामगार,भटके विमुक्त,संघटीत असंघटीत कामगार, मध्यमवर्गीय, बहुजन वर्ग, महिला,विद्यार्थी,युवक, व्यापारी,उद्योजक आदींच्या प्रश्नांवर विधिमंडळात तासानतास भूमिका मांडली वेळ प्रसंगी सभागृह बंद पाडले पण पोटतिडकीने प्रश्न मांडून सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडले. 

 

तत्कालीन राष्ट्रपती महामहिम प्रतिभा पाटील यांच्या हस्ते  2008 साली उत्कृष्ट विधानसभापटू  (उत्कृष्ट वक्ता)  हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.हा गौरव  तमाम श्रमिकांचा होता.


याच अनुषंगाने मास्तरांना भूतपूर्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी,राजीव गांधी,व्ही.पी.सिंग,देवेगौडा,अटलबिहारी वाजपेयी,मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींना समक्ष भेटून कामगारांचे व वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन शिष्टमंडळासोबसल्ला मसलत झाली. 

 

मास्तरांचे आई वडील,पत्नी बहीण भावंडे आणि मुलांसोबत  तब्बल 25 वर्षे भाड्याच्या  अत्यंत दाटीवाटीच्या घरात गुजराण केल्यामुळे ती गैरसोय आणि वास्तव काय असते ते भोगले आणि जगले  सुद्धा. वेळप्रसंगी कित्येक वर्षे, कित्येक रात्री मारुती मंदिरात काढावे लागले. हा त्यांचा अविस्मरणीय अनुभव आहे.ही वेळ कोणावरही येऊ नये.ही त्यांच्या अंर्तमानातील हाक सतत  काही तरी अभिनव कार्य करण्याची  चेतावणी देत होती.


म्हणून ते पहिल्यांदा  1978 ला आमदार झाल्यावर  त्यांच्या आईला दिलेल्या वचनानुसार विडी कामगारांना हक्काचे घर  मिळवून देण्यासाठी कॉ.गोदूताई परुळेकर महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्यामाध्यमातून कुंभारीच्या माळरानावर श्रमिकांचा ताजमहाल म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर  गाजलेल्या व गणलेल्या 10 हजार विडी कामगारांना अत्यल्प दरात घर मिळवून दिले.  तसेच कॉ.मिनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून 5500 घरे त्यानंतर असंघटीत क्षेत्रात  काम करणाऱ्या 30 हजार कामगारांसाठी रे नगर ची योजना अस्तित्वात आणली.रे नगर म्हणजे जागतिक कीर्तीचे महत्वाकांक्षी अभूतपूर्व एकमेव महागृहनिर्माण प्रकल्प होय.  

 

मागील सहा एक दशकात अनेक चळवळीतले साथीदार ज्यांच्यामुळे ते घडले त्यांच्या प्रति असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा इवलासा प्रयत्न या  त्यांच्या आत्मचरित्र पुस्तकाच्या रूपाने व्यक्त होत आहे.  



 

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात काँग्रेस सेवादलला उतरती ‘कळा’ ; काँग्रेस भवन सुटेना, पक्षवाढ होईना हात ‘ टेकले ‘

Next Post

अरे व्वा ! गायक मोहंम्मद अयाज झाले सोलापूरचे ब्रँड ॲम्बेसेडर ; कशासाठी झाली निवड वाचा ही बातमी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

अरे व्वा ! गायक मोहंम्मद अयाज झाले सोलापूरचे ब्रँड ॲम्बेसेडर ; कशासाठी झाली निवड वाचा ही बातमी

ताज्या बातम्या

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971014
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group