सोलापूर : सोलापूर जिल्हासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका व शहर काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच जिल्ह्यात नव्या कार्यकारणीची नेमणूक लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी दिली.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक ही बहू प्रभाग पध्दतीने घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे या निर्णया चे स्वागत करत त्याच पार्श्वभूमीवर सेवादल यंग ब्रिगेडची ताकद राज्यभरात वाढविण्यात येत आहे. यानिमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यातील जिल्हा ,तालुका शहर काँग्रेस यंग सेवादल ब्रिगेडची कार्यकारणी प्राधान्याने नव्याने निवडण्यात येत आहे.
काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून तत्पर असणार्या कार्यकर्त्यांना सेवेची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
नव्या कार्यकारणीच्या नियुक्तीसाठी इच्छुकांनी सोलापूरातील जोडभावी पेठ येथील सुदीप दादा चाकोते यांच्या संपर्क कार्यालयात संपर्क साधावाही असेही आवाहन करण्यात आले आहे.


















