सोलापूर शहरातील काँग्रेस भवनासमोर थकीत उसाच्या बिलापोटी शेतकरी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करताहेत. सुमारे एक महिना होत आला मात्र या शेतकऱ्यांना बिलाचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत.
याच पार्श्वभूमीवर मंगळवारी एमआयएम पक्षाची सभा सोलापुरात झाली या कार्यकर्ता मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार असदुद्दिन ओवेसी तसेच महाराष्ट्रातील खासदार इम्तियाज जलील हे दोन्ही प्रमुख नेतेमंडळी उपस्थित होती. इम्तियाज जलील यांनी काँग्रेस भवनासमोरील शेतकरी आंदोलनाचा उल्लेख आपल्या भाषणात केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे तीन कायदे रद्द केले त्या प्रित्यर्थ काँग्रेस पक्षाने सोलापुरात आनंद साजरा केला मात्र त्यांच्याच कार्यालयासमोर 28 दिवस झाले शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांचा प्रश्न यांना सोडवता आला नाही.
असे म्हणताच ओवेसी यांनी जर पोलिसांनी परवानगी दिली तर आपण निश्चित त्या उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेऊ असे सांगितले त्यावर जलील यांनी जरी काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत नसला तरी एमआयएम पक्ष पूर्ण सोबत आहे, हा विषय संसदेमध्ये उपस्थित करू असे आश्वासन आपल्या भाषणात दिले. काय म्हणाले जलिल


















