सोलापूर : नई जिंदगी भागातील मानवता विकास शिक्षण संस्था संचलित ज्ञानगंगा प्राथमिक मराठी विद्यालयाच्यावतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
जात-पात आणि धर्म न मानता जनतेने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सामाजिक एकोपा राखावा, असे आवाहन MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पेठकर यांनी केले.
यावेळी संस्थेचे संस्थापक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्रीशैल रणधीरे, मुख्याध्यापक कापसे, माजी नगरसेवक तौफिक शेख, ज्येष्ठ नागरिक हसनसाब बडेघर, तौसिक सगरी, पप्पू भाई, ताजुद्दीन मतवाली, संतोष गुळवे, अमीर शेख, कुमारगौरव चंदनशिवे, आतिश वाघमारे, लिंगायत असोसिएशनचे गुरुशांत मोकाशी आदींसह मान्यवर व हजारोंच्या संख्येने महिला व हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते.
रमजान महिन्यामध्ये केवळ मुस्लिम बांधवच नव्हे तर सर्व सोलापूर शहर पंचक्रोशीतील सर्व धर्मीयांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते. या माध्यमातून एकमेकांना भेटण्याची आणि बोलण्याची संधी मिळते,असे येतील हसनसाब बडेघर म्हणाले.
प्रशालेच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचे नेटके नियोजन केले होते, इफ्तार पार्टी यशस्वी करण्याकरता शिक्षक व शिक्षिकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




















