सोलापुर:- सोलापुर शहर युवक काँग्रेसची महत्वाची बैठक सोलापुर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापुर येथे आयोजित केली होती.
यावेळी मध्य विधानसभा अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, दक्षिण सोलापुर विधानसभा अध्यक्ष महेश जोकारे, प्रदेश चिटणीस प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, अनंत म्हेत्रे, ओंकार गायकवाड, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांसमोर बोलताना म्हणाले की, भारत तरुणांचा देश असून परिवर्तन घडविण्याची ताकद युवकांमध्ये असते म्हणून युवकांनी आपल्याला भागात जनतेची कामे करा, अडचणी सोड़वा, काँग्रेस पक्षाचे, शिंदे साहेबांचे, प्रणितीताई शिंदे यांचे काम जनतेपर्यंत पोहोचवा. जिथे अडचण येईल तिथे आपले नेते शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई, इतर नेतेमंडळी, अध्यक्ष म्हणून मी आणि पक्ष आपल्या सोबत राहून ताकद देईल आणि आगामी महानगपालिका निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहिल म्हणून युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कामाला लगावे.
या बैठकीस गणेश साळुंखे, दाऊद नदाफ, विवेक कन्ना, संजय गायकवाड, विवेक इंगळे, सुशीलकुमार म्हेत्रे, बाबूराव क्षीरसागर, ज़ीशान सय्यद, शरद गुमटे, प्रतीक शिंगे, जितु वाडेकर, राजेन्द्र शिरकुल, सुनील सारंगी, अविराज आनंदकर, किरण राठोड, विश्वनाथ दुर्लेकर, धीरज खंदारे, आशुतोष वाले, अली बेनूशिरूर, बबलू जाधव, महेंद्र शिंदे, अजिंक्य पाटील, सूरज मुधोळकर, गणेश म्हेत्रे, रूपसिंग राठोड, वैभव माने, चंद्रकांत नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीचे प्रास्ताविक अध्यक्ष गणेश डोंगरे यांनी तर सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला यांनी केले.



















