महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने गुरुवारी सोलापूर जिल्हा अध्यक्षासह प्रदेश सरचिटणीस प्रदेश सचिव प्रदेश उपाध्यक्ष पदावर अनेक नेत्यांच्या निवड केल्या त्यामध्ये सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी डॉक्टर धवलसिंह मोहिते-पाटील यांची निवड झाली तसेच
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस पदी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, उपाध्यक्ष रामहरी रुपनर तर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सेक्रेटरी अलका राठोड, मनीष गडदे, किसन मेकाले गुरुजी, नरसिंह आसादे, पंडित सातपुते यांच्या निवडी करण्यात आल्या. प्रा पंडित सातपुते यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या सचिव पदी निवड करण्यात आली. यामध्ये ग्रामीण भागातील एक युवा चेहरा म्हणून प्रा पंडित शिवयोगी सातपुते यांना प्रदेश वर काम करण्याची मोठी संधी मिळाली आहे.
कोण आहेत पंडित सातपुते
राहणार – शिंगडगाव तालुका दक्षिण सोलापूर । शिक्षण – M A BEd BPEd । जात- धनगर । वय -42 । नोकरी -अहिल्याबाई जू कॉलेज सोलापूर येथे प्राध्यापक । कार्य – दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेस
सरचिटणीस म्हणून 3 वर्ष काम । नंतर अक्कलकोट विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणुन 5 वर्ष कार्य । नंतर सोलापूर जिल्ला युवक काँग्रेस कार्यअध्यक्ष म्हणून 3 वर्ष कार्य
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आ प्रणिती शिंदे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे कट्टर समर्थक आहेत.

















