नोकरीचे वय संपायला केवळ दोन महिने असताना ऑर्डर हातात पडताच एका महिलेच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. यावेळी सुरेश वाघमारे, रेखा दतात्राय गायकवाड, विश्वनाथ राजेद्र झगळघंटे, श्रीविठ्ठल विश्वनाथ बोमणे, श्रीमंती पदमलता यादव, नौशाद हुसेन शेख, दतात्रय श्रीपती कोळेकर यांना अनुकपा नौकरी आदेश मिळाले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नव्याने नोकरी मिळालेल्या या सर्वांना चांगले काम करा असे सांगत शुभेच्छा दिल्या.
आस्थापनाचे तहसीलदार मोहाळे, नायब तहसीलदार उत्कर्ष देवकुळे, अव्वल कारकुन संदीप माने, झारी, महसुल सघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शंतनु गायकवाड जिल्हा अध्यक्ष मध्यवर्ती संघटनेचे शहर अध्यक्ष देवदास शिंदे प्रशांत भांडेकर ‘ शहर अध्यक्ष अनिल पवार यांची ही उपस्थिती होती. राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड म्हणाले,
2016 पासून अनुकंपा भरतीची यादी प्रलंबित होती, मागील अनेक जिल्हाधिकारी यांच्या कडून जे झाले नाही ते जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी लक्ष घातल्याने आज 7 अनुकंपा धारकांना ऑर्डर मिळाली. नोव्हेंबरमध्ये 3 अशा 10 जणांना ऑर्डर दिली असल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केले.
















