सोलापूर : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सत्तार यांच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत कृषिमंत्री 70 यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी होत आहे सोलापुरात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आणि हटके निदर्शने करण्यात आली..
या आंदोलनात बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपूजे, जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा झाडे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने, प्रदेशचे लतीफ तांबोळी, भाऊ लामकाने, मनोज साठे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
काका साठे सत्तार यांच्यावर टीका करताना म्हणाले, सुप्रिया सुळे या संसदरत्न आहेत त्यांच्यावरील टीका कदापि खपवून घेतली जाणार नाही, अशा वाचाळखोर मंत्र्याचा राजीनामा द्यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस अधिक आक्रमक होईल असा इशारा त्यांनी दिला.


















