सोलापूर । ऑल इंडिया संपादक संघ या संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार व संपादक महेश गायकवाड यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ करण बौद्ध यांनी ही फेरनियुक्ती केली आहे.
भारत देशातील आंबेडकरी आणि बहुजन चळवळीत व दलित चळवळीत कार्यरत असलेल्या वृत्तपत्रांची देश पातळीवर ऑल इंडिया संपादक संघ ही राष्ट्रीय संघटना असून या संघटनेवर सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
महेश गायकवाड हे गेल्या 32 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या मालकीचे चैत्यभूमी हे वृत्तपत्र असून त्यांनी हे वृत्तपत्र आंबेडकरी चळवळीत सतत कार्यरत ठेवले आहेत, साप्ताहिक चैत्यभूमी हे वृत्तपत्र सन 2008 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातुन प्रकाशित होत असते महेश गायकवाड हे वृत्तपत्र क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव असलेले जेष्ठ पत्रकार असून आंबेडकरी चळवळीतील बहुजन चळवळीत तसेच समाजिक आणि सत्यशोधक चळवळीत त्यांचे पत्रकार म्हणून योगदान मोठे राहिले आहे.
ऑल इंडिया संपादक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ करण बौद्ध यांनी महेश गायकवाड यांचे वृत्तपत्र चळवळीतील आणि आंबेडकरी व बहुजन चळवळीतील कार्य बघून त्यांची पुन्हा सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदावर निवड केली आहे, त्यांच्या या निवडी चे विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी स्वागत केले असून महेश गायकवाड यांचे अभिनंदन केले आहेत.


















