Monday, March 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

‘एमआयएम’ बिर्याणीच्या नावावर लोकांना फसवते, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष डॉ वजाहत मिर्झा यांचा आरोप, लवकरच सोलापुरात वक्फ बोर्डाचे कार्यालय

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
20 February 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ वजाहत मिर्झा हे सोलापूर दौऱ्यावर असून काँग्रेस भवनात शहर व जिल्हा अल्पसंख्याक विभागाच्या वतीने त्यांचा आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रकाश यलगुलवार होते. शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक रियाज हुंडेकरी, विश्वनाथ चाकोते,  नगरसेवक तथा अल्पसंख्याक शहराध्यक्ष तौफिक हत्तुरे,नगरसेविका फिरदोस पटेल, जिल्हाध्यक्ष आरिफ पठाण, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी,आरिफ शेख, शकील मौलवी, हासीब नदाफ, रुस्तुम कंपली, झुबेर कुरेशी,वाहिद बिजापुरे, मन्सूर गांधी यांच्यासह मुस्लिम समाजातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर वजाहत मिर्झा म्हणाले, आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रत्येक मुस्लिम कार्यकर्त्याने तयार राहायला हवे. एमआयएमचे नाव न घेता ते म्हणाले, शेजारच्या काही पार्टी येतात बिर्याणीच्या नावाखाली मुस्लिम समाजाला फसवतात आता, त्यांची बिर्याणी नको तर मुलांच्या भविष्यासाठी विचार करण्याची गरज आहे. एमआयएमचा जर तुम्ही अभ्यास केलात तर स्वतःच्या राज्यांमध्ये केवळ सात विधानसभा ते लढवतात मात्र उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र मध्ये किमान 100 जागा लढवल्या जातात या मागचा त्यांचा उद्देश काय? तर तो केवळ मतांचे विभाजन हाच त्यांचा उद्देश असून एमआयएम पासून मुस्लिम समाजाने आत्ताच सावधान व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

डॉ मिर्झा पुढे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वक्‍फ बोर्डाच्या सुमारे 97 हजार एकर जमिनी आहेत, त्यात 40 टक्के अतिक्रमण झाले आहे, या सर्व जमिनीचा रेवेन्यू जर आला तर मुस्लिम समाजाच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारच्या कोणत्याही निधीची गरज पडणार नाही. वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे, मात्र या विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे याची जाणीव जेव्हा आम्ही महाराष्ट्र सरकारला करून दिली तेव्हा 180 जागा भरण्यासाठी सरकारने मंजुरी दिली आहे. आता वक्फ बोर्डाच्या कोणत्याही कामासाठी राज्यातून कुणालाही  औरंगाबादला जाण्याची गरज पडणार नाही सर्व नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे, नोंदणी असेल चेंज रिपोर्ट असेल हे सर्व ऑनलाईन सबमीट करण्याची सोय आम्ही करत आहोत. याचबरोबर राज्यांमध्ये क्‍फ बोर्डाच्या विभागीय कार्यालय आणि जिल्हास्तरीय कार्यालयांना मंजुरी मिळाली असून सोलापुरात लवकरच या कार्यालयाचा शुभारंभ आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करणार असल्याची माहिती डॉक्टर मिर्झा यांनी दिली.

SendShareTweetSend
Previous Post

Solapur : उपमहापौर राजेश काळे पुण्यातून गरजले ; उपमहापौर पदाचा ‘अपशकुन’…….

Next Post

ब्रेकिंग : भाजप सोडलेले बिज्जू प्रधाने करणार याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश ! Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

ब्रेकिंग : भाजप सोडलेले बिज्जू प्रधाने करणार याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश ! Solapur

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972336
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group