सोलापूर : एक वर्षापासून अपहरण प्रकरणातील पाहिजे असलेल्या आरोपीला अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाकडून अटक करण्यात आली आहे.
कृष्णा बलराम कुऱ्हाडे राहणार सोलापूर हा रोहिणीनगर ३, सैफुल येथे येत असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी आरोपीला ३१ डिसेंबर रोजी अटक करून त्याला विजापूर नाका पोलिस ठाण्यात हजर केले.
ही कारवाई अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाचे पोलिस निरीक्षक व्ही. एस. कुर्री, राजेंद्र बंडगर, तृत्पी मंडलिक, रमादेवी भुजबळ यांनी आरोपीचा शोध घेत त्याला पकडले.


















