सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या वाघेश्वर घामचे वाघेश्वर महाराज यांचे हात जोडून स्वागत केले.
तो फोटो त्यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत त्या खाली लवकरचं सोलापूर नगरीत बाघेश्वर धामचे सरकार धीरेंद्र शास्त्री यांची भेट बाघेश्वर महाराज यांनी मला आवर्जून त्यांच्या दरबारी येण्याचे आमंत्रण दिले.. धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे बागेश्वर धाम सरकार म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय महाकाव्य कथाकार आणि #बागेश्वर_धाम_सरकार #महाराज म्हणून प्रसिद्ध असलेले #हिंदू_आध्यात्मिक_नेते आहेत. शास्त्री हे भारतातील मध्य प्रदेश राज्यातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक तीर्थक्षेत्र बागेश्वर धाम सरकारचे पीठाधीश्वर आहेत. असे लिहिले आहे.
दरम्यान या पोस्टनंतर उमेश पाटील यांच्यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे. त्यांचा निषेध ही करण्यात येत आहे. वाचा त्या पोस्ट काय आहेत.


























