सोलापूर : लिंगायत समाजातील नेते उदय पाटील यांचा भारतीय जनता पार्टीत झालेला प्रवेश आणि त्यामुळे सोलापुरात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असे बोलले जात आहे. या पार्शभूमीवर शुक्रवारी भारतीय जनता पार्टीचे शहर उत्तरचे आमदार देशमुख आणि शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी सोलापूर श्रमिक पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी उदय पाटील हे भाजपमध्ये आले त्यांचा पक्षाला कितपत फायदा होईल असा प्रश्न विचारला असता दोन्ही देशमुखांकडून उत्तर व्यवस्थित आले नाही. यावेळी पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी उलट पत्रकारांना प्रतिप्रश्न केला यावेळी नक्की काय घडले पहा व्हिडिओ..


















