सोलापूर- स्व. दादा यांच्या नंतर दिलीपराव माने हे जनतेच्या हितासाठी अविरत काम करीत असुन तालुक्यातील आज तिसरी पिढी देखील माने परिवारासोबतविश्वासाने सोबत आहे. युवकांनी गावात सामाजिक व विधायक काम करुन युवा मंचला लौकिक मिळवून द्यावा असे सभापती रजनी भडकुंबे यांनी आवाहन केले.
युवानेते पृथ्वीराज माने युवा मंच उत्तर सोलापूर तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यावेळी त्या बोलत होत्या.कार्यक्रमास ब्रह्मदेवदादा माने बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, पंचायत समिती सदस्य हरीदास शिंदे, बाबासाहेब पाटील, बाळासाहेब सुरवसे, नानासाहेब पवार, अँड.अजित पाटील, उमेश भगत,नेताजी सुरवसे आदि मान्यवर उपस्थित होते.
सहकार तपस्वी स्व.दादानी जनतेच्या हितासाठी,न्यायासाठी सतत संघर्ष केला. त्यांचा वारसा आपले मार्गदर्शक दिलीपराव माने कणखरपणे चालवत आहेत.त्यांचा आदर्श व संस्कार घेऊन पृथ्वीराज माने युवकांना घेऊन काम करीत आहेत.आज तालुक्यातील युवकांनी पृथ्वीराज माने युवा मंच काढुन कामासाठी व्यासपीठ केले आहे या माध्यमातून सामाजिक, विधायक व विकासात्मक काम करुन युवा मंचचा लौकिक वाढवा असे सभापती भडकुंबे यांनी सांगितले.
माने परिवाराने सामान्य कार्यकर्त्यांना बळ देवून योग्य ठिकाणी संधी दिली तर शेतकरी, सर्वसामान्याच्या न्यायासाठी सतत संघर्ष केला.म्हणून आज माने परिवाराचे मागे तालुक्यातील तिसरी पिढी उभी असल्याचे ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांनीअभिमानाने सांगितले.
तालुक्यातील जनतेने माझे आजोबा, माझे बाबावर अलोट प्रेम केले, संघर्ष करण्यास ताकद, विश्वास,बळ दिले. मलाही आपण त्यांच्यापेक्षा अधिक बळ देत आहात हे माने परिवाराचे भाग्य आहे.तालुक्यातील सर्व युवकांना सोबत घेऊन विकासात्मक काम करेन असे पृथ्वीराज माने यांनी सांगितले.
यावेळी नुतन पदाधिका-यांच्या नावाची घोषणा करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तालुकास्तरीय कार्यकारणी याप्रमाणे
अध्यक्ष- सुनिल विठ्ठल जाधव (गुळवंची) उपाध्यक्ष-युवराज मनोहर जगताप ( मार्डी)यश युवराज मेठे( डोणगाव) अजित सुभाष पाटील( कळमण)सदस्य- विशाल भारत भोसले ( नान्नज)ओंकार रावसो शिंदे (कोंडी)विनोद काशीनाथ माने (कांरबा) इरफान बाशूभाई पठाण ( तिर्हे) सचिन बाळकृष्ण ढेपे (पाकणी)कमलाकर बळीराम भोसले( भोगाव). राघव रामचंद्र गरड(रानमसले)तुकाराम दत्तात्रय पवार(दारफळ गावडी)रविकिरण दामोदर बंडगर(पाथरी)अमीत संभाजी भडकुंबे(हगलूर)रोहित मारुती गोरे (हिरज)सुरेश प्रकाश पाटील (बाणेगाव) प्राजक्ता प्रताप टेकाळे (नान्नज)सौ. मंजुश्री योगेश भोसले (कवठे)सौ. रेश्मा तात्या कदम (मार्डी)सचीव-तात्या विठ्ठल कदम, प्रसिद्धीप्रमुख-ओंकार लक्ष्मण केंगार.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेश्मा कदम यांनी केले. यावेळी प्रमोद गवळी, शहाजी भोसले,मुरलीधर शिंदे,बबलू सुरवसे,चंद्रहास पवार, गणेश शिंदे, युवराज नवगिरे, मोतीराम पवार, तानाजी भोसले,सागर तांबे आदि उपस्थित होते.




















