सोलापूर जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एकच्या वतीने कॅशलेस आरोग्य विमा योजना अमलात आणून सभासदांना व त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा चक्र देण्याचे काम जिल्हा परिषद पतसंस्था क्रमांक एक च्या वतीने करण्यात आले ही बाब निश्चित गरजेचे असल्याचे प्रतिपादनमुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पतसंस्था क्रमांक एक च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या आरोग्य विमा योजनेचे कुटूंबाचे कार्ड वाटप शुभारंभ प्रसंगी केले.
याप्रसंगी अजयसिंह पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. किरण लोहार शिक्षणाधिकारी प्राथमिक ,जावेद शेख जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण, कार्यकारी अभियंता व मार्गदर्शक पंडित भोसले , डॉ.अनिरूद्ध पिंपळे, डॉ.इरफान सय्यद, डॉ. विलास,सर्वादे, रफिक शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर ,सचिन जाधव,या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रातिनिधीक स्वरुपात श्रीधर नादर्गी, तजमुल मुतवली, डी. आर. पवार, श्रीमती सुमित्रा पुजारी, रेणुका प्रथमशेट्टी, सुधाकर सातव, महेश नारायणकर , श्रीकांत म्हेरकर, श्रीकांत माने, या सभासदांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करणेत आले.
सदरची योजना ही काळाची गरज असून काळाची गरज ओळखून पतसंस्थेने ह कौतुकास्पद उपक्रम राबविल्याबद्दल पतसंस्थेच्या कार्याचे अभिनंदन श्री दिलीप स्वामी यांनी केले. याप्रसंगी प्रास्ताविक चेअरमन हरिबा सपतळे यांनी केले,आभार प्रदर्शन व्हाइस चेअरमन धन्यकुमार राठोड , सूत्र संचालन डॉ. एस पी माने यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक विवेक लिंगराज,श्रीशैल्य देशमुख, दत्तात्रेय घोडके, दिपक घाडगे, सुहास चेळेकर, अनिल जगताप, शेखर जाधव, सुखदेव भिंगे, शाजाहन तांबोळी, सुंदर नागटिळक, विष्णू पाटील, त्रिमुर्ती राऊत, मृणालिनी शिंदे सुनंदा यादगिरी, सचिव दत्तात्रय देशपांडे, उपस्थित होते. सुभाष काळे, अशोक पवार, विनोद कदम, नितीन येमुल यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
















