सोलापूर : 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण विभाग पंचायत समिती मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोळ तालुक्यातील नेताजी प्रशाला मोहोळ येथे जिल्हास्तरीय किशोरी हितगुज मेळावा मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
सदर किशोरी मेळाव्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सीईओ आव्हाळे यांनी आपल्या भाषणात मुली सक्षम बनल्या पाहिजे असे सांगत तसेच मी IAS होण्यासाठी अपार कष्ट घेतले. एका लहानशा 800 ते 1000 लोकवस्ती असलेल्या खेडेगावातून मी शिकून पुढे आले. मी शिकत असताना लोक चेष्टा करत होते, ही मुलगी काय शिकणार? कुठे मोठ्या पदावर ती काम करणार असे बोलले जात होते. त्यामुळे मी जिद्दीने प्रयत्न करून मंगरूळपीर या गावातून शिकून पुढे आले. व IAS पदवी संपादन केली सध्या सहाय्यक जिल्हाधिकारी या पदावर काम करीत आहे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहे. त्यामुळे येथे उपस्थित असलेल्या सर्व मुलींनी कशाचीही भीती न बाळगता कोणालाही न डगमगता शिक्षण घेतले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास प्राथमिक शिक्षणअधिकारी संजय जावीर व मोहोळ तालुक्याचे गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे तसेच मुख्यालयाचे विस्तार अधिकारी शिक्षण हरीश राऊत, गोदावरी राठोड व शेख यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या मेळाव्यात कर्तुत्वान महिलांच्या मुलाखती, आरोग्य विषयाबाबत व्याख्यान, मुलींची वक्तृत्व स्पर्धा, मोहोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खारगे यांचे निर्भया पथक यांची व्याख्यान आयोजित करण्यात आलेली होती. किशोरीची प्रतिज्ञा, विविध स्पर्धा, मानवी मनोरे, उत्कृष्ट लेझीम सादरीकरण तसेच चार बीटच्या उत्कृष्ट संस्कृती कार्यक्रमाची सादरीकरण करण्यात आले.
याप्रमाणे विविध विषय व उपक्रम उत्कृष्टपणे सादरीकरण सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिवशी खेडेगावातून आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलींसाठी उपयुक्त असे विविध स्पर्धा तसेच कर्तुत्ववान महिलांच्या जीवनावर आधारित व्याख्यान झाले.
मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील किमान 700 मुलींचा सहभाग या मेळाव्यात होता.






















