आमदार सुभाष देशमुख यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या शिवणी, तिऱ्हे, पाथरी, हिरज या नदीकाठच्या गावांना भेट दिली. पावसामुळे नेस्तनाबूत झालेली शेतांतील विदारक परिस्थिती त्यांनी पाहिली शेतकऱ्यांचे सोयाबीन हे पीक पूर्णपणे पाण्यात दिसून आले, जे आहे ते पाण्यामुळे खराब झाल्याचे चित्र होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली.
यावेळी संबंधित अधिकारी यांना त्वरीत पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन आमदार देशमुख यांनी दिले.
याप्रसंगी नायब तहसीलदार विश्वजित गुंड, कृषी अधिकारी क्षीरसागर ,भोसले, तिर्हे तलाठी, पाकणी सरपंच सुनील गुंड, हिरज सरपंच नागटिळक, शिवणी सरपंच राखे, उपसरपंच युवराज गुंड, पाथरी सरपंच श्रीमंत बंडगर, तिर्हे ग्रामपंचायत सदस्य विशाल जाधव, महेश पवार, राम जाधव, तिर्हे सोसायटी संचालक नानासाहेब चव्हाण, आण्णा जावळे, विठ्ठल मल्लाव, प्रताप मल्लाव, बालाजी मल्लाव, आनंद मल्लाव, सुनिल मल्लाव, घनःश्याम पाटील, आकाश पवार, राजू जाधव, संदिप गोरे, संदिप गुंड, संजय शिंदे, शशिकांत पवार, विजय जाधव, दिपक जाधव, विश्वनाथ जाधव, पपू जाधव, युवराज पवार, रत्नाकर पवार, लक्ष्मण जाधव, रामा खराडे, समाधान राऊत, मंगेश घदुरे, प्रकाश पाटील, बापू पाटील तसेच परिसरातील शेतकरी बांधव उपस्थिती होते.























