सोलापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा दया, तसेच भरघोस मानधन वाढ करा, कामासाठी लागणारे मोबाईल त्वरीत दया या मागण्यांसाठी राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. काळ्या साड्या घालून शासनाचा निषेध करण्यात येत आहे. मंगळवारी आंदोलनाचा दुसरा दिवस होता दुपारच्या सुमारास काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी या आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.
दरम्यान उपस्थित अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करताना प्रणिती शिंदे यांनी शासनाने निर्णय न घेतल्यास येणाऱ्या अधिवेशनात आपला प्रश्न मांडू असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी काँग्रेसच्या सत्तेमध्ये महिलांना मिळणारी वागणूक, त्यांचा होणारा आदर आणि आत्ताच्या भाजपच्या सत्तेमधील फरक सांगितला.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा करीत असताना अनेक महिला भावाप्रमाणे राहुल गांधी यांच्या जवळ येऊन त्यांना मिठ्या मारत होत्या मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जातील तेव्हा त्यांना मिठी मारण्याची हिम्मत होईल का? असा प्रश्न केला असता उपस्थित सर्व अंगणवाडी सेविकांना एकच हशा पिकला…पहा हा व्हिडीओ

















