सोलापूर : सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना,५८ महिन्याची थकबाकी,१४१० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, रिक्त जागा भरणे या मागण्यांसाठी सोलापूर विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. मंगळवारी दुसरा दिवस होता. यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदेंनी आंदोलनाला भेट दिली. आपला जाहीर पाठिंबा देताना आगामी अधिवेशनात विदयापीठ कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवणार असे आश्वसन दिले.
१५ फेब्रुवारी २०२३ ला राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सेवक संयुक्त कृती समितीची बैठक झाली. या बैठकित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना,५८ महिन्याची थकबाकी,१४१० कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करने, रिक्त जागा भरणे याबाबत अत्यंत सकारात्मक चर्चा झाली व उपमुख्यमंत्री यांनी या मागण्यांबाबत योग्य ते निर्देश वित्त मंत्रालय व उच्च तंत्र शिक्षण विभागाला दिले होते. परंतु बैठकीत झालेली चर्चा व सेवक कृती समितीकडे प्राप्त इतिवृत्त यामध्ये तफावत असून बैठकीतील झालेल्या चर्चानुसार जोपर्यंत शासन निर्णय निर्गमित होत नाही तोपर्यंत नियोजित टप्प्यानुसार सुरु असलेले बेमुदत आंदोलन पूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजीचा बेमुदत काम बंद आंदोलन दुसरा दिवस विद्यापीठ परिसरात यशस्वी पार पाडला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटना अध्यक्ष सुनील थोरात, महासंघ उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे, महासंघ प्रतिनिधी संतोष क्षीरसागर, सरचिटणीस रविकांत हुक्कीरे उपाध्यक्ष कांचन आघाव, मंगेश कुलकर्णी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्रीशैल देशमुख, राजीव खपाले, चिटणीस दिलीप हाके, श्रीमती उज्वला दंतकाळे व्यवस्थापन समिती सदस्य, जाकीर पठाण, तुकाराम पवार, श्रीमती स्वेता स्वामी, भागवत घंटे, मुख्तार शेख उपस्थित होते.


















