सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी सिंचन योजनेसाठी पाणी देण्याला मंजुरी मिळाली आहे. याला सोलापूर जिल्ह्यातून विरोध होऊ लागला असून महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना खबरदार पालकमंत्री सत्तेची मला गरज नाही असे सांगत उजनीतून पाणी नेल्यास आम्ही रान पेटवू असा इशारा दिला होता.
सोलापुरात होत असलेला विरोध पाहता सध्या पालकमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे Dattatray Bharane हे सोलापुरात गोकुळ साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला आले नाहीत. दरम्यान रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण Vidya Chavan या सोलापूर दौऱ्यावर होत्या त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उजनी धरणातील Ujani Dam पाण्याचा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला.
सत्तेतील मित्र पक्ष असलेल्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे MLA Praniti Shinde यांनी सुद्धा इशारा दिला आहे, यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस आपली भूमिका स्पष्ट का करत नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर उत्तर देताना विद्या चव्हाण यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा गैरसमज झाला आहे, त्या मित्र पक्षातील आमदार आहेत. येत्या 3 जून रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील Jayant Patil हे सोलापूर दौऱ्यावर असून ते उजनी धरणाच्या पाणी प्रश्नावर सर्वांचा गैरसमज दूर करतील अशी माहिती चव्हाण यांनी दिली.


















