सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग या गावामध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हायातीमध्ये असताना 24/04/ 1937 साली या भागातल्या सर्व नागरिकांनी व भीमसैनिकांनी खास करून वळसंग मधल्या राहणाऱ्या भीमनगरमध्ये जी ऐतिहासिक विहीर बांधण्यात आली. ती विहीर भीमनगर मधील सर्व समाज बांधवांनी लोकवर्गणीतून गोळा करून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर 24 एप्रिल 1937 बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते रेशमी धागा व चांदीचा ग्लास बुडवून त्यावेळी विहिरीचा उद्घाटन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीमध्ये झालेले आहे.
त्या ऐतिहासिक विहिरीचा दुसरा टप्प्याचा सुशोभीकरणाचे काम या ठिकाणी हाती घेण्यात आले आहे. डीपीसीच्या माध्यमातून 70 लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर जिल्हा परिषदचे सी.ई.ओ. दिलीप स्वामी या सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले आहे. ज्यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे होते त्यावेळी एक कोटी निधी देण्याचे जाहीर केले होते.
सध्याचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिल्यानंतर एक कोटीचा निधी देण्याचे डिक्लेअर केले यावेळी अक्कलकोटचे आमदार कल्याणशेट्टी व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांना वेळोवेळी आनंद चंदनशिवे यांनी निवेदन व विनंती केली होती. यामुळे तात्काळ 70 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला.




















