बसपा आणि बहुजन आघाडीमधून “वंचित” झाल्यानंतर नगरसेवक आनंद चंदनशिवे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या अतिशय जवळ गेले आहेत मामांच्या दौर्यात कायमचे सोबत असतात, आनंद चंदनशिवे यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला भरणे मामा जातात, भरणे मामाने आनंद दादा आमच्या पक्षात या अशी थेट ऑफर दिली होती.
यावरून चंदनशिवे हे राष्ट्रवादीचा संपर्क वाढला होता ते महेश कोठे सोबत ही वावर वाढला, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात ऐकण्यास मिळाली. पत्रकारांसमोर चंदनशिवे हे कायमच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कौतुक करताना दिसून आले.
याच पार्श्वभूमीवर गुरुवारी मुंबईमध्ये आनंद चंदनशिवे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे, नगरसेवक गणेश पुजारी, चंदनशिवे यांचा भाचा रवी कोळेकर यांची उपस्थिती होती. येणाऱ्या 2 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सोलापूर शहरात आहेत त्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडत असताना दिसतय.
महेश कोठे हे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या बुधवारी छापून आल्या मात्र बुधवारी रात्री उशिरा समजले की महेश कोठे प्रवेश करणार नाही त्यांच्याऐवजी त्यांचे अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी मध्ये जाणार आहेत. आता चंदनशिवे यांनी भेट घेतली ते राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा आता ऐकण्यास मिळू लागले आहे. बौद्ध व मातंग समाजाच्या मतांच्या गठ्ठयावर आजपर्यंत निवडून आलेले चंदनशिवे यांना राष्ट्रवादीच्या घड्याळवर जनता स्वीकारणार का हासुद्धा मोठा प्रश्न आहे.

















