सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील शशिधर पोतदार व त्याची पत्नी आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटकपूर्व जामीन वर सोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय येथील न्यायमूर्ती ए. एस.गडकरी यांनी सुनावली.
१.रमेश दिनकर पोतदार राहणार मंगळवार पेठ सोलापूर २. ईरण दिनकर पोतदार राहणार बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर व ३.ईरण्णा मल्लप्पा सुतार राहणार कडगंची तालुका आळंद जिल्हा गुलबर्गा असे तिघांना अटकपूर्व जामीन वर सोडण्याचे आदेश केलेले आहे.
यातील पार्श्वभूमी अशी की,शशिधर मनोहर पोतदार यातील फिर्यादी व आरोपी रमेश दिनकर पोतदार यांच्यामध्ये सोने खरेदी विक्रीचा चा व्यवहार होता. सदर व्यवहार सन 2009 ते 2014 दरम्यान होते .तद्नंतर आरोपी यांनी फिर्यादीस सन 2009 ते २०14 पर्यंत आरोपी लोकांनी 38 लाख रुपयाची फसवणूक केली असे लक्षात आले. त्यावेळी फिर्यादीने सदर पैशाची मागणी केली असता आरोपी लोकांनी फिर्यादीस सहा ते सात वेळा नागणसूर येथे घेऊन जाऊन पैसे देत नाही व पैसे मागितले फिर्यादी व त्याच्या कुटुंबास खलास करून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर घरी आरोपी लोक हे फिर्यादी च्या घरी जाऊन पैसे देणार नाही असे म्हणून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व तसेच फिर्यादीच्या पत्नीस अश्लील शिवीगाळ व झोंबाझोंबी केले व तसेच विष पिऊन मरा असे म्हणून निघून गेले.
त्यानंतर दिनांक २२.०७.२०२१रोजी फिर्यादी व त्याची पत्नी हे आरोपी यांनी सन 2009 ते २०१४ पर्यंत सोन्याच्या व्यवहारात तसेच शेती खरेदी विक्री व्यवहारात अशी एकूण 43 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली व फिर्यादी पैसे मागण्यास गेले असता त्यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली व विष पिऊन मरा तुमची जगायची लायकी नाही अशाप्रकारे आत्महत्या करा अशी धमकी दिली. सदरच्या धमकीमुळे फिर्यादी व त्याची पत्नी यांनी मिरची पिकाचा फवारणी औषध पिले व त्यानंतर बेशुद्ध झाले.त्यांच्यावर उपचार करण्यात आले व फिर्यादी व त्याची पत्नी हे शुद्धीवर आले. अशा आशयाची ची फिर्याद मनोहर पोतदार यांनी अक्कलकोट दक्षिण येथे दाखल केले सदर फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
यात आरोपी यांना अटक होईल म्हणून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला परंतु सदरचा अटकपूर्व जामीन अर्ज मेहरबान सत्र न्यायालय यांनी नामंजूर केले तदनंतर आरोपी यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी न्यायमूर्ती श्री ए.एस गडकरी यांच्यासमोर झाली. यात दोन्ही पक्षाचे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायमूर्ती यांनी वरील सर्व आरोपीस अटकपूर्व जामिनावर सोडण्याचे आदेश केले. यात आरोपीतर्फे ॲड. विक्रांत फताटे तर सरकार तर्फे ॲड. विरा शिंदे यांनी काम पाहिले.



















