सोलापूर : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तालुक्याचे मुख्यालय येथे डेमो हाऊस प्रकल्पांतर्गत पंचायत समिती आवारात बांधलेल्या डेमो हाऊसचे उद्घाटन दिलीप स्वामी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले .याप्रसंगी ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना एक आदर्श मॉडेल म्हणून काम करणार आहे असे प्रतिपादन केले.
वेळेत पूर्ण केल्याबद्दल पंचायत समिती घरकुल विभागाचे व बांधकाम विभागाचे अभिनंदन केले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक संतोष धोत्रे हे होते. प्रमुख उपस्थिती म्हणून अजयसिंह पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी, चंचल पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन तथा तालुका संपर्क अधिकारी, जावेद शेख जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बालकल्याण, उमेश कुलकर्णी सहाय्यक प्रकल्प संचालक होते.
त्याचबरोबर या कार्यक्रमास तालुक्याचे खातेप्रमुख आसिफ खैरदी, सुनील कटकधोंड, मुनाफ अडते,म्हलारी बनसोडे, डॉ. रणजीत जाधवर ,डॉ. दिगंबर गायकवाड,समाधान नागणे उपस्थित होते. विक्रमाचे प्रास्ताविक गट विकास अधिकारी राहुल देसाई सूत्रसंचालन सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज तर आभार प्रदर्शन सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती रंजना कांबळे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पूनम नरसोडे ,निर्मला राठोड, आप्पासाहेब गायकवाड ,महेश रुपनर जगदीश मेटकरी इस्माईल मुलानी, रोहन चव्हाण विशाल मालतुमकर, नागेश कदम, विशाल कुंभार ,कैलास जीदे, बाळासाहेब म्हमाने, बापूसाहेब भिसे, स्थापत्य अभियांत्रिकी अयुब मुलानी, खांडेकर ,रिमा पवार, शकुंतला जाधव, रवी कोरे, श्रीकांत माने, विकास म्हेत्रे रवी इग्लोर आदींनी परिश्रम घेतले.



















