जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूरच्या लिंगायत असोसिएशनच्या वतीने नारीशक्तीच्या कार्य गौरव सोहळ्यात तब्बल 51 महिलांचा आगळावेगळा पद्धतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ बसव प्रचारक सिंधुताई काडादी होत्या. बसवरुढ मठाचे मठाधीश शिवपुत्र महास्वामी, शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गट मनीष काळजे, डॉक्टर स्मिता चाकोते स्किन स्पेशलिस्ट, सुरेखा होळीकट्टी अक्कलकोट तालुका भाजप अध्यक्ष, विठ्ठल काळजे ठाणे अंमलदार, पद्मावती शिवगुंडे, लिंगायत असोसिएशनचे अध्यक्ष adv संतोष होसमनी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम करण्यात आले.
या कार्यक्रमात संगीता तोडकरी, राजश्री थळंग, स्मिता नडगिरी, निर्मला तांबे, डॉक्टर सोनाली घोंगडे, रुद्रअंबिका बागदुरे, राजश्री सट्टे, क्षितिजा मेंडके, सुजाता हुमनाबादकर, राजश्री आमले, सुचित्रा सक्करशेट्टी, उमा पाटील, कावेरी माळी, मेघा सरसंबी,श्वेता कनाळे, पल्लवी चक्रे, श्रीदेवी जत्ती, अंबिका पाटील, दीपा तोटद, महादेवी तेली, कलावती गणाचारी, संगीता दसाडे, प्रभावती काळे, लिंबाबाई बगले, मेघा दारफळे, वनिता बिराजदार, शोभा नरोळे, सुवर्णा बिराजदार, रोहिणी वायचळ, मोहिनी वायचळ,सुनंदा मडयाळ, विजयालक्ष्मी सुलतानपूर, श्रीदेवी तालीकोटी, नागम्मा होटगी , मीनाक्षी बिराजदार, शशिकला ब्रहानपुरे, स्मिता नाईक, सुवर्णा बोरगावकर, मीनाक्षी अक्कलकोट, सुष्मिता बडगेरी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तबगार महिलांचे शाल व फेटे बांधून सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता असोसिएशनचे सचिव डॉ अमोल वळसंगे, रेवणसिद्ध दिकसंगी, श्रीशैल जम्मा, नरेंद्र घोडके, प्रदीप उळागड्डे, गजानन हुमनाबादकर, लक्ष्मीकांत कोरे, गुरुशांत मोकाशी, शिवानंद हुमनाबादकर, योगीराज मलशेट्टी, संजय हुमनाबादकर, सचिन अक्कलवाडे, विलास कस्तुरे, अजित पाटील आदींनी परिश्रम घेतले




















