सोलापूर : सात रस्ता परिसरात होत असलेल्या महसूल भवनाचे काम हे शेवटच्या टप्प्यात आहे, शेवटची फिनिशिंग इथे चालू असल्याचे चित्र आहे. लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयातील काही प्रमुख कार्यालये याठिकाणी शिफ्ट होणार आहेत.
या नूतन महसूल भवनाची जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, यांच्यासह महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग सह इतर अधिकारी उपस्थित होते.
जेव्हा पालकमंत्री हे कॉन्फरन्स हॉल मध्ये आले तेव्हा तिथे काय काय सुविधा आहे याची माहिती घेतली. त्यावेळी या हॉल मध्ये एसी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले, तेव्हा अरे इथे एसी नाही का? असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर जिल्हाधिकारी शंभरकर हे म्हणाले, अरे इथे एसीचे प्रयोजन करून घ्यायचे ना, तेव्हा पालकमंत्री व आमदार कल्याणशेट्टी यांनी एसी बसविण्याच्या सूचना केल्या.
नंतर दर्शनी भाग पाहून विविध सूचना केल्या. पालकमंत्र्यांनी बेसमेंट मधील वाहने पार्किंगची पाहणी करून तसेच चालत नियोजन भवनात दाखल झाले.




















