Thursday, March 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अभिनंदन ! सोलापूरच्या आरोग्य सेविकेचा राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान ; सोलापूर झेडपी आरोग्य विभागाचा गौरव

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
7 November 2022
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 






सोलापूर : मनिषा भाऊसाहेब जाधव मागील 18 वर्षे पासून आरोग्य खात्यामध्ये आरोग्य परिचारिका म्हणून आरोग्यसेवा अविरतपणे निभावत आहेत. आज दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांना “राष्ट्रीय फोरेन्स नाईटींगल पुरस्कार 2021 ” या सर्व उत्कृष्ठ पुरस्काराने आपल्या देशाचे नवनिर्वाचित राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.



 १२ मे १८१० हा फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिवस. संपूर्ण आयुष्य त्यांनी आरोग्य-परिचारिका म्हणून आरोग्य सेवेत घालवले. त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये “जागतिक परिचर्या दिन ” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून भारत सरकार द्वारे प्रत्येक वर्षी उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य परिचारिकेस “फ्लोरेन्स नाइटिंगेल” यांच्या नावाने दिला जाणारा सर्वोच्य पुरस्कार बहाल केला जातो.

आरोग्यसेवेतील चांगले काम पाहून मनिषा भाऊसाहेब जाधव यांची नुकतीच देशपातळीवर दिला जाणारा “नॅशनल फ्लॉरेन्स नाइटीनगेलं पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून निवड झाली होती आणि आज हा पुरस्कार राष्ट्रपती यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम 50 असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेवून आपल्या उत्कृष्ठ कामातून राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र होणे ही बाब खर तर सोलापूर जिल्ह्यासाठी साठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण प्रथमच आरोग्य विभागातून सोलापूर जिल्ह्यामधून  या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

मनीषा भाऊसाहेब जाधव यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण त्यांच्या गुरसाळे, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर या जन्मगावी पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी कामा आणि अल्बलेस रुग्णालय मुंबई या ठिकाणावरून 18 महिन्याचे आरोग्य सेविकाचे प्रशिक्षण 2002 ला पूर्ण केले. त्यानंतर महानगरपालिका सोलापूर येथे आरोग्य विभागामध्ये 2003 ते 2004 दरम्यान आरोग्यसेविका या पदा वर काम केले. त्यानंतर 2005 दरम्यान त्यांची निवड जिल्हा परिषद सोलापूर यांचे कडून आरोग्यसेविका या पदासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र माणकी, तालुका माळशिरस या ठिकाणी करण्यात आली आणि आज त्या प्राथमिक आरोग्य केंद्र मोरोची, उपकेंद्र धर्मपुरी जिल्हा सोलापूर याठिकाणी कार्यरत आहेत. आरोग्यसेवेतील काम करत असताना त्यांनी स्वतःचे पुढील शिक्षण चालू ठेवले. आज त्यांनी पदवी पर्यंत चे शिक्षण पूर्ण करून पुढील पदव्युत्तर शिक्षण चालू ठेवले आहे. त्याशिवाय कामा आणि अल्बालेस रुग्णालय मुंबई याठिकाणी  2017 दरम्यान आरोग्य सेवेतील  LHV चे 6 महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्याठिकाणी 7 जिल्हा मधून प्रथम क्रमांकाने उतीर्ण झाल्या. त्याशिवाय त्या करत असलेल्या आरोग्यसेवेतील चांगल्या कामामुळे अनेक वेळा त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

 त्यांना तालुका पातळीवर  २०१३ आणि २०१४ मध्ये “कुटुंब-नियोजन शस्त्रक्रिये”मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल सलग दोन्ही वर्षे “प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र त्यावेळेचे सोलापूर जिल्हा परिषदेचे  मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार यांचे हस्ते देण्यात आले होता. त्यांनी २०१७ मध्ये “जननी-सुरक्षा योजना” शस्त्रक्रियेमध्ये उत्कृष्ट काम केल्याने तालुका पातळीवरती त्या करत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रथम क्रमांक आला होता. त्यासाठी चा पुरस्कार तात्कालीन मुख्य कार्यकारी अधीकारी राजेंद्र भारूड यांचे हस्ते प्रधान करण्यात आला होता. त्याशिवाय १२ मे २०१८

रोजी उत्कृष्ट कामाबद्दल  “कामा आणि अल्ब्लेस रुग्णालय मुंबई” यांचे तर्फे दिला जाणारा “आदर्श परिचारिका” हा पुरस्कार देण्यात आला होता. १५ ऑगस्ट २०२० रोजी त्या करत असलेल्या कामाच्या ठिकाणी  “ग्रामपंचायत धर्मपुरी” यांचे वतीने झेंडा वंदनाचा मान देऊन कोरोना काळात केलेल्या चांगल्या कामाचा सन्मान केला गेला. कोरोना काळामध्ये एका दिवशी ४३२ कोरोना टेस्ट आणि तीन दिवसामध्ये ११०० कोरोना टेस्ट केल्या गेल्या होत्या त्याबद्दल “प्राथमिक आरोग्य अधिकारी” मोरोचीचे वैदयकिय अधिकारी डॉ. मेहता साहेब यांचे कडून चांगल्या कामाची प्रशंसा केली गेली होती.  

 त्याशिवाय त्या अनेक सामजिक कार्यात भाग घेत असतात.

दरवर्षी 1 मे रोजी चे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्या अनेक सामाजिक संस्थांना काही ना काही मदत करत असतात. ज्या मध्ये गरजू-गोरगरीब, अंध-अपंग शाळा, सामाजिक-शैक्षणिक संस्थांना वस्तू रूपाने अथवा आर्थिक मदत करत असतात.   

त्यांचे पती कै.भाऊसाहेब जाधव हे भारतीय सैन्य दलात सेवा केली होती. त्याशिवाय त्यांचा कारगिल युद्धामध्ये देखील सहभाग होता .आपल्या मुलाने ही देश सेवा करावी यासाठी त्याची डिफेन्स मध्ये निवड होण्यासाठी प्रयत्न करत होत्या. नुकतीच त्यांचा मुलगा साहिल भाऊसाहेब जाधव याची वयाच्या १९ व्या वर्षी डिफेन्स मधील द्वितीय स्तर मुलाखतीमधून कोर्स-४७ बॅच मध्ये निवड झाली आहे. जी आशिया खंडातील सर्वात अवघड मुलाखत समजली जाते. आज त्यांचा मुलगा भारतीय सेनेमध्ये लेफ्टनंट या पदावर बिहार मध्ये पुढील प्रशिक्षण घेत आहे.


जाधव यांना देशपातळीवरच्या फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. जाधव यांच्या कामामुळे सोलापूर जिल्हा परिषदेचा देशपातळीवर सन्मान झाला आहे.

-दिलीप स्वामी. मुख्य कार्यकारी अधिकारी


सोलापूर जिल्हा आरोग्य विभागासाठी जाधव यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान होणे अभिमानास्पद बाब आहे. आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून मला याचा आनंद आहे. जाधव यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे आरोग्य विभागाची मान उंचावली आहे.

डॉ. शितलकुमार जाधव जिल्हा आरोग्य अधिकारी

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर शहर व जिल्ह्यात मोठी पोलीस भरती ; जाहिरात प्रसिद्ध, SRPF च्या ही जागा

Next Post

सोलापूरात विमानतळाचा विषय पेटणार ; स्वाक्षरी मोहीम जोरात, नागरिकांचा प्रतिसाद

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरात विमानतळाचा विषय पेटणार ; स्वाक्षरी मोहीम जोरात, नागरिकांचा प्रतिसाद

ताज्या बातम्या

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973160
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group