यू.जी.सी. नेट परीक्षा डिसेंबर 2022 सत्राचा निकाल गुरुवारी रात्री जाहीर झाला. महाविद्यालयात प्राध्यापक होण्यासाठी पात्रता म्हणून ही अत्यंत कठीण परीक्षा घेतली जाते. त्यामध्ये अक्षय सतीश चव्हाण यांना यश प्राप्त झाले. ते मुळचे तांबोळे (ता. मोहोळ, जि. सोलापूर )येथील आहेत. त्यांनी पुण्यातील नामांकित फर्ग्यूसन महाविद्यालय येथून एम.एस.सी. पर्यावरण शास्त्र विषयाचे शिक्षण पूर्ण केलेले आहे.
अक्षय यांना प्राध्यापक डॉ.आशिष माने, डॉ.आमीर मुल्ला व सहकारी प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे श्रेय अक्षय यांनी वडील सतीश चव्हाण आणि आई सारीका चव्हाण यांना दिले.


















