Thursday, March 19, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अभिनंदन ! उमेद अभियानात सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम ; महिला बचतगटांना तब्बल ‘इतक्या’ कोटीचे अर्थसहाय्य

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 May 2022
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ग्रामीण महिलांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनाकडून उमेद अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. उमेद अभियानाची वचनबध्दता टिकवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली सन 2021-22 या आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करीत 98.33 टक्के उद्दिष्ट साध्य करीत उमेद अभियानात राज्यात प्रथम स्थानावर झेप घेतली आहे. 

ग्रामविकासामध्ये महिलांचा विकास हा महत्त्वाचा विषय असून यासाठी महिलांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी उमेद अभियानात सोलापूर जिल्ह्याने नेहमीच चांगले काम केले आहे. या वर्षात सोलापूर जिल्ह्यातील स्वयं सहाय्यता गटाच्या महिलांना सक्षम बनविण्यासाठी व शक्य असेल त्या मार्गाने उपजीविका उभ्या करणाची मोहीम सीईओ स्वामी यांनी गतिमान करून स्वयंसहाय्यता गटांना तब्बल 186 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून 114 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.उमेद अभियानाच्या माध्यमातून बचतगटांनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून ग्रामीण भागातील महिलांना मोठा आर्थिक आधार देण्यातही सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे. 

यासाठी प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी जिल्हा व तालुकास्तरावर बॅंकेसोबत बैठका घेणे व तालुकास्तरावर कार्यशाळा आयोजित करणे यास्तरावर प्रयत्न केले.

तसेच संस्थिय बांधणी मध्ये धर्मादाय आयुक्त कार्यालयामार्फत समूह ग्रामसंघ व प्रभागसंघ नोंदणी करण्यात सुध्दा राज्यात प्रथम रुक्मिणी सप्ताह राबवून बचतगटांच्या उत्पादीत मालास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.

यामध्ये ब्रांडींग, पॅकेजिंग व बाजारपेठेत व्यापाऱ्यांशी टाय अप करण्यासाठी मार्गदर्शन केले. ज्या गावात 15 पेक्षा जास्त बचतगट आहेत अशा गावात रुक्मिणी सप्ताह राबविण्यात आला.

यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व प्रकल्प संचालक संतोष धोत्रे यांनी वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केला होता.

प्रकल्प संचालक संतोष धोत्रे व उमेद अभियानातील अधिकारी व कर्मचारी व विविध समुह संसाधन व्यक्ती यांनी सन 2021-22 या वर्षात अत्यंत संवेदनशीलता दाखवून राज्यात प्रथम क्रमांकाचे काम केले आहे. ग्रामीण भागातील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी  त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असे प्रतिपादन यावेळी सीईओ स्वामी यांनी केले.

*चालू आर्थिक वर्षात बचत गटांच्या उत्पादनांचे ब्रॅंडींग करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सीईओ स्वामी यांनी सांगितले.*

SendShareTweetSend
Previous Post

ब्रेकिंग : सिनेअभिनेता रितेश देशमुख सोमवार 9 मे रोजी सोलापुरात

Next Post

केंद्रीय मंत्री रामदास आठवले बुधवारी सोलापुरात ; शहरात बऱ्याच ठिकाणी भेटीगाठी

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

केंद्रीय मंत्री रामदास आठवले बुधवारी सोलापुरात ; शहरात बऱ्याच ठिकाणी भेटीगाठी

ताज्या बातम्या

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026

क्राईम

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1972677
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group