सोलापूर : आज-काल जीवाभावाच्या माणसांचा वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात सर्वत्रच आहे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांवात शेख परिवारातील सदस्यांनी जीव लावलेल्या मुक्या प्राण्यांचा केक कापून वाढदिवस साजरा केलाय.
कासेगांव येथील शेख परिवारातील भावंडांनी त्यांच्या घरात पाळलेल्या मोगली नावानं ओळखल्या जात असलेल्या मांजरीच्या २ पिलांचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला. त्यांच्या वाढदिवसाला, सोमवारी, दि. २४ मे रोजी केक कापून त्या पिलांना ‘ हॅपी बर्थ टू यू ‘ म्हटलं.
शेख परिवारातील सिमी हसीना, उमर फारूक आणि तस्लिमा शेख यांनी त्या पिलांसाठी अभिष्ठचिंतन केलं. आज माणसां-माणसांतील अंतर वाढत असतांना, जीव लावलेल्या मुक्या प्राण्यांचा वाढदिवस साजरा होणं, हेही विशेषच !


















