सोलापूर : अनिल वाघमारे यांनी नई जिंदगी सारख्या भागात शिक्षण संस्था काढून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांचं संपूर्ण कुटुंब शिक्षणाच्या चळवळीत काम करतंय. आता त्यांची नगरसेवक होऊन या भागाचा विकास करण्याची इच्छा आहे. राजकारणात संधी मिळते, कधी मिळत नाही परंतु या भागातील स्थानिक नेते बाबा मिस्त्री आणि आम्ही तुम्हाला तिकीट मिळवून देऊन नगरसेवक करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही व शुभेच्छा माजी आमदार दिलीप माने यांनी दिल्या.
राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल वाघमारे सर यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार गरजू महिलांना साडी वाटप कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रमुख उपस्थिती माजी आमदार दिलीप माने यांची होती. व्यासपीठावर माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, सिद्धार्थ गायकवाड, श्रीशैल रणधीरे, अविनाश मार्तंडे, रावसाहेब भालेराव, बंटी चंदनशिवे, तात्या मगर, महिबूब मुल्ला, किशोर गायकवाड, बशीर सय्यद, भिकाजी गायकवाड, अक्षय वाघमारे यांच्यासह वाघमारे मित्रमंडळी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी अनिल वाघमारे यांचा वाढदिनी सपत्नीक सत्कार करण्यात आला.
संभाजी भडकुंबे, रावसाहेब भालेराव, अक्षय वाघमारे यांनी शुभेच्छा देताना वाघमारे यांनी आता नगरसेवक होऊन या भागाचा विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना अनिल वाघमारे यांनी मजरेवाडी भागाचा विकास होण्यात स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. दिलीप माने हे आमदार असताना जुळे सोलापूर भागाचा विकास झाला, आता पुन्हा माने यांच्या नेतृत्वाची गरज या भागाला असून त्यांनी आमदारकी लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.





















