सोलापूर : मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संवेदनशीलतेचे अनेक वेळा दर्शन घडले आहे. तशीच संवेदनशीलता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्याकडून दिसून आली. मंगळवारी सीईओ दिलीप स्वामी हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी विमानतळावर गेले होते, त्यामुळे ते कार्यालयात नव्हते.
सायंकाळी साडे पाचच्या सुमारास कोहिनकर हे आपल्या चेंबरमध्ये सर्व विभाग प्रमुखाची बैठक घेत होते. बराच वेळ काही विद्यार्थिनी त्यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या होत्या, काही पत्रकारांनी त्यांची विचारपूस केली, तेव्हा त्यांना कोहिनकरांना भेटायचे होते. पत्रकारांसोबत त्या मुली आत गेल्या. पत्रकारांनी सांगताच मिटिंग सोडून त्यांनी त्या मुलींना जवळ बोलावले, ‘बाळांनो, काय अडचण आहे सांगा’ म्हणून विचारपूस केली.
त्यामुलींकडे दोन निवेदन होती. जिल्हा परिषदेचे शेळगी जवळ सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह आहे, तिथल्या समस्या घेऊन त्या आल्या होत्या. सविस्तरपणे म्हणणे ऐकून घेतले, संबंधित प्राथमिक शिक्षण विभागाला तातडीने सूचना केल्या, बुधवारी अधिकारी व रेक्टर यांना भेटण्यास सांगितले. अधिकाऱ्यांनी ऐकूण घेतल्याने विद्यार्थिनी आनंदी चेहऱ्याने बाहेर पडल्या. त्यातील एका विद्यार्थिनीने अधिक माहिती दिली ती काय म्हणाली पहा..


















