सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 109 ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल मंगळवारी वाजले. त्यामुळे आता या सर्व गावांमध्ये निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आता सहा नोव्हेंबर पर्यंत या गावांमध्ये आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक आणि मतदारांवर परिणाम होईल अशी कोणतेही विकास कामे करता येणार नाहीत.
बुधवारी जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी जिल्हा निवडणूक शाखेकडून त्या 109 गावांची यादी मागून घेतली आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला त्या सर्व गावांमधील प्रशासकीय मान्यता व वर्क ऑर्डर थांबवण्याच्या सूचना दिल्या.
या गावांमध्ये होणार आहे निवडणूक
अक्कलकोट : दहिटणे, हसापूर, जेऊरवाडी, करजगी, नन्हेगाव, तळेवाड, कुडल, केगाव बु., बिजगेर, केगाव खु., कलकर्जाळ, जकापूर, शावळ, कंटेहळ्ळी, धारसंग, म्हैसलगे, रामपूर इटगे, घुंगरेगाव.
बार्शी- उंडेगाव, मुंगशी वा, आंबाबाईची वाडी, चिंचोळी ढेंबरेवाडी, घारी.
करमाळा -भगतवाडी, जेऊर, राजुरी, चिखलठाण, गोंडरे, उंदरगाव, कंदर, कोर्टी, निंभोरे, केतूर, वीट, रामवाडी, घोटी, रायगाव, कावळवाडी, केम.
माढा- पिंपळखुंटे, आढेगाव, अंजनगाव खे, अंबाड, वडशिंगे, मुंगशी, लोणी नाडी, कन्हेरगाव, तुळशी, चांदज, वडोली, टेंभूर्णी, रोपळे क, पिंपळनेर,
माळशिरस- माळीनगर, धर्मपुरी, कारुंडे, वाफेगाव, देशमुखवाडी, कन्हेर, लवंग, कोंढारपट्टा, सवतगव्हाण, दहिगाव.
मंगळवेढा : शिरसी, अकोले, जंगलगी, खडकी, खुपसंगी, जुनोनी, महमदाबाद, बटाण, अंदळगाव, शेलेवाडी, उचेठाण, ब्रम्हपुरी, निंबोणी, मुंढेवाडी, जालीहाळ, नंदूर, चिक्कलगी, भाळवणी, हिवरगाव, रेडे, लक्ष्मीदहिवडी, लोणार, मानेवाडी, डिकसळ, पडोळकरवाडी, रेवेवाडी, देगाव,
सांगोला : खवासपूर, सावे, चिकमहुद, वाढेगाव.
दक्षिण सोलापूर : गावडेवाडी, शिरवळ, कासेगाव, वळसंग, कुसूर, दोड्डी, तिल्लेहाळ, औज आ, उळेवाडी, उळे,
मोहोळ : मलिकपेठ, जामगाव खु गुरसाळ, ईश्वरवठार, पुळूज.