सोलापूर : ग्रामीण पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये एपीआय अतुल श्रीधर भोसले व अनिल गुरूबसप्पा सनगल्ले यांचा समावेश असून वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांना पोलीस कल्याण शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे तर स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांना वळसंग पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पदी नियुक्ती देण्यात आली आहे. एसपी सरदेशपांडे यांनी 23 जानेवारी 2023 रोजी हे आदेश काढले.