सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारोह म्हणून ‘मेरी माटी मेरा देश ” अर्थात ” माझी माती माझा देश’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
१४ ऑगस्ट रोजी जय भवानी सोसायटी, आर्किटेक्चर कॉलेजच्या पाठीमागील विरंगुळा केंद्र येथे सकाळी ९ वाजता अमृत वाटीका ७५ देशी झाडांचे वृक्षारोपन कार्यक्रम, अमृत वाटीका येथे ध्वजारोहन कार्यक्रम व पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे.
महानगरपालिकेच्या कॅम्प शाळा लष्कर येथे सकाळी १० वाजता शिलाफलकम उद्घाटन कार्यक्रम व पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे. हुतात्मा स्मृती मंदिर येथे सकाळी ११ वाजता शहिद जवान, माजी सैनिक तसेच स्वातंत्र्य सैनिक वीरांना वंदन कार्यक्रम व सत्कार समांरभ तसेच पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे.
दरम्यान महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी अधिक माहिती देताना हे आवाहन केले..