लोकमंगल फाउंडेशन व लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकमंगल शिक्षक रत्न व आदर्श शाळा पुरस्कार कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाच्या विषयाचे ज्ञान देण्याबरोबरच कसे जगावे याचेही ज्ञान देण्याची गरज आहे असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अरुण अडसूळ यांनी सोलापुरात बोलताना व्यक्त केले.
लोकमंगल सहकारी पतसंस्था आणि लोकमंगल फाउंडेशन यांच्या शिक्षक रत्न पुरस्कारांचे वितरण करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या समारंभात अकरा शिक्षक आणि दोन जिल्हा परिषद शाळांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
चार हजार रुपयांची पुस्तके आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार सुभाष देशमुख यांनी भूषविले होते. डॉक्टर ह. ना. जगताप आणि पुरस्कार निवड समितीचे सदस्य, लोकमंगल फाउंडेशन चे मान्यवर व लोकमंगल पतसंस्थेचे संचालक यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.