राज्य शासनाने नऊ ऑगस्टच्या आत राज्यातील सर्व प्रशासकीय बदल्या करण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक यांच्या बदल्यांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मागील दहा दिवसांपूर्वीच निवासी उपजिल्हाधिकारी पदावर शमा पवार या रुजू झाल्या. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचा आरडीसी हा चार्ज गेल्याने अनेक कर्मचारी हिरमुसले होते, बदल्यांच्या पार्श्वभूमीवर वाघमारे साहेबांचा चार्ज केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती त्यामुळे आपल्या बदल्यांचे काय होणार म्हणून मागील चार दिवसांपासून कर्मचारी वाघमारे यांच्या उपजिल्हा निवडणूक शाखा कार्यालयात ये जा करत होते.
शेवटी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी बुधवार 11 ऑगस्ट रोजी बदल्यांची ऑर्डर टाकली. त्यामध्ये 158 बदल्या करण्यात आल्या असून तलाठी संवर्गातून मंडलाधिकारी संवर्गात तीस जणांना प्रमोशन देण्यात आले, मंडलाधिकारी सत्तावीस, अव्वल कारकून त्रेचाळीस व महसूल सहाय्यक 58 अशा प्रमोशन सह 158 बदल्या करण्यात आल्या आहेत.
सोलापूर शहराचे लक्ष लागलेल्या शेळगी सर्कल आणि सोलापुर सर्कल या दोन पदावर चर्चेचे चेहरे कोणी आले नाहीत उत्तर सोलापूर मंडल अधिकारी पदावर महसूल शाखेतील नसल नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन येथील अव्वल कारकून सी के हेडगिरे यांची मंडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर शेळगी सर्कल पदावर करमाळा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचे लेखावर कारकून एस पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.